Translated By Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य -: Shutterstock
Read this in English
मासिकपाळीच्या दिवसात किमान 3-5 दिवस स्त्रियांना कमी जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो. या स्त्रावासोबत मळमळणे, ब्लोटींगचा त्रास होणे, पोटदुखी किंवा पोटात क्रॅम्स येणे अशा समस्यादेखील जाणवतात. पण काहींना मासिकपाळीचा त्रास हा अतिरक्तस्त्रावामुळे त्रासदायक वाटतो. अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणे हा एक विकार नसला तरीही सतत रक्तस्त्राव होण्याचा त्रास दीर्घकाळ टिकला तर ते चिंतेचे कारण ठरू शकते. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यास अॅनिमिया किंवा थकवा जाणवण्याचा, दम लागण्याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण अधिक असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तसेच रक्तस्त्रावाच्या प्रमाणाबरोबरच या अन्य 10 मासिकपाळीच्या समस्यांबाबत तुमच्याही मनात प्रश्न पडले आहेत का?
- अतिरक्तास्त्रावाचे प्रमाण म्हणजे नेमके किती ?
मासिकपाळीच्या काळात प्रत्येक स्त्रीच्या शरीरातून कमी-जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो. त्यामुळे सामान्य रक्तस्त्राव आणि असामान्य रक्तस्त्राव रक्तस्त्राव नेमका कसा ओळखावा हा प्रश्न सहाजिकच अनेकींच्या मनात डोकावून जातो. वैद्यकीय दृष्ट्या मासिकपाळीच्या काळात 40 ml रक्त म्हणजेच सुमारे 3 टेबलस्पून रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे. परंतू याचे प्रमाण 70 ml किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होत असल्याचे समजावे. पण यासोबत अन्य काही लक्षण आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- मासिकपाळी 7 दिवसांपेक्षा अधिक काळ चालणे.
- 1-2 तासाने सॅनिटरी पॅड बदालावा लागणे.
- सतत पोटाच्या खालच्या बाजूला दुखत राहणे.
- जाडसर रक्ताच्या गुठळ्यांचा स्त्राव होणे.
- या दिवसात अति थकवा, श्वास घेण्यास त्रास जाणवणे.
( नक्की वाचा : वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय )
- अतिरक्तस्त्रावाची कारणं काय ?
#1 फायब्रॉईड्स -
गर्भाशयाच्या आतल्या बाजूला गाठींची निर्मिती होणं हे मासिकपाळीच्या दिवसात अति प्रमाणात रक्तस्त्राव होण्यामागील कारण असू शकते. या गाठी कॅन्सरच्या नसल्याने काळजी करू नका. लहानशा शस्त्रक्रियेने त्यांना काढून टाकणे शक्य आहे.
#2 हार्मोन्सचे असंतुलन -
स्त्रिया पौडंगावस्थेमध्ये किंवा मेनोपॉजच्या टप्प्यावर असताना हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने अतिरक्तस्त्रावाचा त्रास वाढतो. या काळात स्त्री शरीरात प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. परिणामी रक्तस्त्रावदेखील वाढतो. नक्की वाचा : PCOS च्या या ’7′ लक्षणांकडे दुर्लक्ष मूळीच करू नका !
#3 गर्भारपणातील काही दोष -
गर्भाची निर्मिती गर्भाशयाऐवजी फेलोपियन ट्युबमध्ये होणं किंवा गर्भपात अशा शारिरीक अवस्थेमध्येदेखील अतिप्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. गर्भाच्या निर्मितीची स्थिती चुकल्यास किंवा गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्यास अतिप्रमाणात रक्तस्त्राव होतो.
#4 कॅन्सर
शरीरात काही कॅन्सरची निर्मिती होताना अतिप्रमाणात रक्त स्त्राव होतो. ओव्हेरियन किंवा सर्व्हायकल कॅन्सरमध्ये शरीरात गर्भाशयाजवळच्या पेशींचे रुपांतर नॉन कॅन्सरस सेल्समधून कॅन्सरस सेलमध्ये होताना हा त्रास अधिक होतो.
#5 संसर्ग / दाह
पुनरोत्पादनाच्या काही अवयवांमध्ये संसर्ग वाढल्यास अतिरक्तस्त्रावाचा त्रास वाढतो. यामुळे वेदना जाणवतात. pelvic inflammatory disease मध्ये गर्भाशयात झालेल्या संसर्गामुळे अतिप्रमाणात रक्तस्त्राव होतो.
#6 रक्ताचे विकार
काही आजारांमध्ये रक्ताच्या निर्मीतीमध्येदेखील दोष निर्माण होतो. याचा परिणाम मासिकपाळीच्या रक्तस्त्रावावरदेखील जाणवतो. थायरॉईडचे विकार, यकृतामधील संसर्ग किंवा किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास हा त्रास वाढतो. प्लेटलेट्स डिसऑर्डरमध्येदेखील रक्ताच्या गुठळ्या वाढतात. याचा परिणाम मासिकपाळीच्या काळात दिसून येतो.
छायाचित्र सौजन्य -: Shutterstock
Read this in English
( नक्की वाचा : वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय )