Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कलरफूल आणि टेस्टी बीटरूट सॅलॅड

$
0
0

Read this in English

छायाचित्र सौजन्य – Shutterstock (छायाचित्र केवळ प्रातिनिधिक स्वरूपात )

Translated By  -  Dipali Nevarekar

उन्हाळ्याच्या दिवसात भरपेट जेवणापेक्षा अनेकांचा कल हलकेफुलके खाण्याकडे अधिक असतो. जेवणासोबत टेस्टी आणि हेल्दी तसेच आबालवृद्धांना आवडणारे सॅलेड म्हणजे बीटरूट सॅलॅड. चवीला फारसे इंटरेस्टिंग नसणारे बीटरूट फक्त काप करून खाणे किंवा रस पिणे मुलांना आवडत नाही. मग त्यांच्यासाठी या सॅलेडला थोडा हेल्दी ट्विस्ट देऊन खायला द्या. ( नक्की वाचा : उन्हाळ्यात घ्या आस्वाद या ’5′ स्वादिष्ट अन अल्हाददायक सलाड्सचा ! )

बीटरूट हे लालसर असल्याने दिसायला अत्यंत मोहक दिसते. त्यामुळे त्याचा आस्वाद प्रत्येकाला घ्यावासा नक्कीच वाटेल. बीट हे रक्तवर्धक असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रास कमी होतो. मधूमेही, गर्भवती स्त्रिया आणि रक्तदाबाचा त्रास असणार्‍या लोकांच्या आहारातही फायदेशीर ठरतो. बीटाचा आहारात समावेश केल्याने सेक्सलाईफही सुधारते, सेक्सश्युअल स्टॅमिना वाढतो. त्यामुळे चटकदार आणि कलरफूल बीटरूट सलॅडचा आहारात नक्की समावेश करा. ( नक्की वाचा : बीटरूट – अ‍ॅनिमियावर मात करणारा नैसर्गिक उपाय ! )

साहित्य -: 

  • 2 किसलेले बीट
  • मूठभर चिरलेली कोथिंबीर
  • 1 छोटा चिरलेला टोमॅटो
  • ¼चमचा साखर
  • ½ चमचा तिखट
  • ½चमचा धनेपूड
  • ¼ चमचा जिरापूड
  • चिमूटभर हिंग़
  • अर्धा लिंबू
  • चवीपुरता मीठ

कृती - 

  • एका भांड्यात बीटाचा किस काढून घ्या.
  • त्यावर कोथिंबीर, टोमॅटो, साखर घालून मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर तिखट, धने-जिरेपूड, व हिंग हे  मसाले घाला.
  • सलाडचा आस्वाद घेण्यापूर्वी किमान 15-20 मिनिटे आधी त्यावर लिंबू पिळा.
  • या सार्‍या पदार्थांमुळे बीट थोडे मऊ होईल.
  • रात्रीच्या जेवणात सूपसोबत या टेस्टी सॅलेडचा नक्की आस्वाद घ्या.

टीप :

चवीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाजलेले तीळ मिसळू शकता. यामुळे सलॅड अधिक चवदार होण्यास मदत होईल. बीटाऐवजी तुम्ही कोबी किंवा गाजराचा समावेश करू शकता.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>