वर्तमानपत्र, सोशल मिडीया अशा सार्या माध्यमातून समोर आलेला अनंत अंबानीचा नवा अवतार अनेकांना अचंबीत करून गेला. सर्वत्र चर्चा होतेय ती म्हणजे अनंतच्या घटलेल्या वजनाची आणि नव्या लूकची. स्थूल अनंतला सार्यांनीच मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यान चिअर करताना किंवा प्रार्थना करताना पाहिलयं.पण अनंतचा नवा लूक हा अनेकांना प्रेरणादायी निश्चितच ठरणार आहे. या ’9′ पदार्थांमधील साखर वाढवतेय मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या !
अनंतने आपल्या 21 व्या वाढदिवसासाठी सचोटीने 18 महिन्यांत तब्बल 108 किलो वजन घटवले आहे. हा चमत्कार कोणत्याही सर्जरी किंवा अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने नसून तर कठोर व्यायाम, डाएट, योगाच्या सहाय्याने त्याने स्थूलपणा परिणामकारकपणे कमी केला आहे. जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज !
अनंतने परिणामकारकपणे घटवलेल्या वजनामुळे अंबानी कुटुंबीयांप्रमानेच त्यांच्या मित्रपरिवारातून तसेच सोशल मिडीयातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचा कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यानेदेखील अनंतला वाढादिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे कौतुक केले आहे.
Wish u a very happy birthday Anant.u gave the best gift to urself by losing over 100kg.discipline and determination pic.twitter.com/0BNEl0drlH
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) April 10, 2016
आयपीएलचे चेअरमॅन राजीव शुक्ला यांनीदेखील अनंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्जरी शिवाय परिणामकारकपणे वजन घटवण्याच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
With AnantAmbani on his 21st birthday He lost 108 kg in 18 months without any surgery what a will power pic.twitter.com/Vu9jF9p9Mo
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) April 9, 2016
अनंत अंबानीच्या या हेल्दी बॉडी ट्रान्सफरमेशनचा नीता अंबानी यांनीदेखील अभिमान आहे. अनंत हा निरोगी स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणार्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.