छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मेष – या आठवड्यात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहानसहान आजारांकडेही दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. जुन्या व्याधींवरही वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपचार करा. मध्यमवयीन तसेच वयोवृद्धांनी स्वास्थ्य जपण्यासाठी सकाळ-संध्याकाळ चालणे गरजेचे आहे.
वृषभ -: मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयातील लोकांना काही जुन्या व्याधी असल्यास त्याकडे या आठवड्यात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्यास ग्रहांची अनुकुलता नसल्याने चिंता वाढतील. म्हणूनच आरोग्याची विशेष काळजी घ्या. योगा, ध्यानसाधना करा.
मिथून : आरोग्यासाठी ग्रहमान अनुकूल नसल्याने चिंता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहानसहान आरोग्यविषयक समस्यादेखील त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. वाढत्या वयानुसार येणार्या समस्यांकडे वेळीच लक्ष द्या.गुडघेदुखीच्या त्रासावर वेळीच लक्ष द्या.
कर्क -: आरोग्यविषयक समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास किंवा उपचाराअभावी त्यांची गंभीरता वाढण्याची शक्यता आहे. श्वसनाच्या विकारांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. पचनमार्गात बिघाड होण्याची शक्यता असल्याने जंकफूडचे सेवन टाळा. अधिकाधिक फळं खाण्यावर भर द्या.
सिंह : काही जुन्या व्याधी पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र नव्या आरोग्यविषयक चिंता वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे स्वास्थ्य ठीकठाक असले तरीही ते गृहीत घेऊ नका. उलट व्यायाम, योगाच्या सहाय्याने फीटनेस वाढवण्याचा प्रयत्न करा.
कन्या : राशीतील ग्रहमान काही अनपेक्षित आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. आजारपण वाढल्यास काही दिवस घरीच सक्तीचा आराम करणे भाग पडेल. त्यामुळे अरबट चरबट ,जंकफूड खाणे टाळा.
तूळ : काही लहान आजार या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. श्वसनाशी निगडीत समस्यांकडे त्वरीत लक्ष द्या. कमकुवत पचनशक्ती त्रासदायक ठरण्यापूर्वी त्यावर व्यायामाने मात करा. यासाठी मॉर्निंग वॉकची सवय लावून घ्या.
वृश्चिक : तीव्र दातदुखी, घशातील खवखव यामुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच डेन्टिस्टकडून वैद्यकीय मदत घ्या. मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांना जुन्या विकारांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी अल्टरनेटीव्ह मेडीसीन नक्कीच फायदेसहीर ठरू शकते.
धनू : मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध लोकांना वयानुसार येणारा सांधेदुखीचा त्रास तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यावर अल्टरनेटीव्ह उपचारांनी मात करण्याचा प्रयत्न करा. ग्रहांची साथ नसल्याने आरोग्यविषयक चिंता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या.
मकर : ग्रहांची प्रतिकुलता आरोग्यविषयक चिंता वाढवण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक त्रासदायक समस्या वाढण्याआधीच त्यावर मात करा. स्वास्थ्य आणि स्टॅमिना सुधारण्यासाठी जीममध्ये नियमित व्यायाम करा.
कुंभ : या आठवड्यात पचनाचे विकार आणि पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. त्यावर तात्पुरते उपचार न करता कायस्वरूपी हा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करा. श्वसनाशी निगडीत समस्या वेळीच दूर करा.
मीन : हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरणार आहे. मध्यमवयीन लोकांनी जुन्या शारिरीक व्याधींवर वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. अस्थमा, उच्च रक्तदाबाचा त्रास याकडे दुर्लक्ष करू नका.