आयसीसी टी-20 च्या धमाक्यानंतर भारतीय क्रिकेट रसिक आयपीएलच्या 9 चा थरार अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधी मुंबईत भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यत आले होते. रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडीस यासमवेत काही हिंदी सिनेसृष्टीतील तार्यांनी आपल्याडान्स परफॉर्मन्स या कार्यक्रमात रंग भरले. पण रसिकांवर भूरळ पाडण्यात अपयशी ठरलेल्या या कार्यक्रमात ‘कॅट’चा जलवा मात्र भाव खाऊन गेला. कॅटरीनाच्या फ्लॅट अॅब्स आणि ठुमक्यांनी वेस्ट इंडीज खेळाडू ब्राव्हो समवेत अनेकांना मंत्रमुग्ध केले होते.
कॅटरीनाच्या साधेपणातच तिच्या सौंदर्याचे गुपीत दडलेलं आहे. त्यामुळे ‘चिकनी चमेली’ची तरुणाईत प्रचंड क्रेझ आहे. मात्र कॅटरीनाच्या आयपीएलमधील ठुमक्यांनी आणि फ्लॅट अॅब्सनी तिच्या फीटनेस फंड्याबाबतची कुतूहूलता वाढली आहे.
DJ Bravo’s #ChampionDance & Katrina Kaif’s Abs. This #IPLOpeningCeremony Will Only Be Remembered For That.
#IPL pic.twitter.com/LX6E9aYF6a
— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) April 8, 2016
आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईमुळे, व्यस्त जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढण्याची समस्या आबालवृद्धांमध्ये सर्रास आढळून येते. फ्लॅट बेलीसाठी कठोर डाएट किंवा आहारातून भात पूर्णपणे टाळलाच पाहिजे असे तुम्हांला वाटत असेल परंतू आहारशास्त्र आणि काही अभ्यास मात्र नेमके उलटेच सांगते. जेवणाच्या वेळा टाळणेदेखील लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरतात-. म्हणूनच स्वास्थ्य जपून आरोग्यदायी पद्धतीने फ्लॅट अॅब्स मिळवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकता.
(नक्की वाचा : पोटाची चरबी कमी करण्यात, ‘ कडूलिंबाची फुले’ गुणकारी ! )
फ्लॅट बेली मिळवण्यासाठी आहारात कोणते आरोग्यदायी बदल कराल ?
- जंक फूड टाळा - जंकफूड चटकदार असले तरीही आरोग्यदायी नाही. अति तेलकट पदार्थांमुळे शरीरात चरबी वाढते.
- ‘फायबर’युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा – आहारात फायबरचा समावेश केल्यास ‘पोट सुटण्याच्या’ समस्येपासून तुमची सुटका होईल. त्यामुळे आहारात सोल्युबल व इनसोल्युबल फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. संत्री,रासबेरी यासारखी फळं, ब्रोकोली ,कोबी यांमधून शरीराला उच्च प्रतीचे फायबर मिळते.
- भरपूर पाणी प्या – आहारात घेतलेल्या फायबर घटकांचे कार्य सुरळीत करण्यासाठी पाणी मदत करते. त्यामुळे सतत हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी पाणी भरपूर पिणे, फळांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
- पोटॅशियम पदार्थांचा आहारात समावेश करा - आहारात मुबलक प्रमाणात पोटॅशियमयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र यासोबत पुरेसा व्यायाम करा म्हणजे फॅट साचून राहण्याचा धोका कमी होईल.
- कृत्रिमरित्या गोडवा वाढ्वणारे पदार्थ टाळा - साखरमुक्त व कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असलेले पदार्थ, कृत्रिमरित्या गोडवा वाढवणारे घटक असे पदार्थ पचायला कठिण असतात.अशा पदार्थांमुळे पोटात ग़ॅस वाढण्याची शक्यता असते.
येथे पहा कॅटरिनाचा परफॉर्मन्स -
व्हिडीयो सौजन्य -: VIVO IPL 2016