छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
भारतीय जेवणात भात हा एक अविभाज्य घटक आहे. पण त्यामुळे वजन वाढते, पोट वाढते असे काही समज त्याविषयी असल्याने वजन घटवण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण भात टाळतात. केवळ चपाती -भाजी आणि सलॅड हे खाऊन जेवण झाल्यासारखे वाटत नाही. म्हणूनच आहारतज्ञ दीपशिखा अग्रवाल यांच्यामते भाताचा आहारात समावेश किती प्रमाणात करणे आरोग्यदायी आहे हे नक्की जाणून घ्या. नक्की वाचा - मऊ खिचडीभाताचा आस्वाद घ्या या ’5′ आरोग्यदायी कारणांसाठी !
दीपशिखाच्या मते, भारतीयांच्या जेवणात भात हा प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे दोन्ही जेवणात भाताचा समावेश केला तरीही शरीराला त्याची सवय झालेली असते. अचानक पांढर्या भाताऐवजी ब्राऊन राईस आहारात घेतल्यास शरीराला तो बदल स्विकारण्यास वेळ लागतो तसेच त्याचा मेटॅबॉलिझमवरही परिणाम होतो. पांढर्या नॉन रिफाईंड तांदळामध्ये व्हिटॅमिन बी 12चा मुबलक साठा असतो. त्यामुळे शाकाहार्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. मांसाहार्यांना मीट, अंड, मासे, दुग्धजन्य पदार्थांमधून मुबलक प्रमाणात व्हिटामिन बी 12 मिळते. भातामुळे अतिखाण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. ग्ल्युटेन फ्री डाएटवर असणार्यांच्या आहारात भाताचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. तांदळाच्या कोणत्या प्रकारातून किती कॅलरी मिळते हे नक्की जाणून घ्या.
टीप्स -:
- प्रमाणात भात खाणे हे आरोग्यासाठी हितकारी आहे. वेट लॉसच्या मिशनवर असणारेदेखील आठवड्यातून तीन वेळा आहारात भाताचा समावेश करू शकतात.
- पांढरे तांदूळामध्ये स्टार्च सारखे कॉम्लॅक्स कार्बोहायड्रेटेस मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे नॉन रिफाईंड तांदळाचा आहारात समावेश करा. दक्षिण भारतात वापरला जाणारा तांदूळ हा पोषणद्रव्यांनी मुबलक आणि कमीत कमी स्टार्चनी युक्त असतो.
- भाताचाअ समावेश दुपारच्या जेवणात करावा. यावेळेत शरीराचा मेटॅबॉलिक रेट अधिक असतो. अशावेळी भातातून मिळणारे कार्बोहायड्रेट्स शरीराला उर्जा पुरवण्याचे काम करतात.
- भातासोबत डाळी आणि सॅलॅडचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला फायबर्सचाही पुरवठा होतो.