मेष –
तुमच्या राशीतील ग्रहमान आरोग्यास पुरक असल्याने या आठवड्यात रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहील. त्यामुळे आरोग्य ठणठणीत राहील. मधूमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी या नियमित चाचणी करणे आवश्यक आहे. स्वास्थ्य सुरळीत राहण्यासाठी या आठवड्यात हलका व्यायाम करा.
वृषभ -
हा आठवडा मधूमेहींसाठी त्रासदायक आहे. त्यामुळे आहाराचे पथ्यपाणी कटाक्षाने पाळा. तसेच नियमित चेकअप करा. सांधेदुखीच्या रुग्णांसाठीदेखील हा आठवडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे समस्या अधिक वाढू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
मिथून –
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे या आठवड्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच श्वसनाची निगडीत काही त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हांला दक्ष राहणे गरजेचे आहे.
कर्क –
या आठवड्यातील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे आजारपणाची लक्षणं दिसताच वेळीच उपचार सुरू करा. श्वसनमार्ग आणि पचनक्रिया बिघडण्याची दाट शक्यता आहे. मध्यम वयीन गटातील लोकांनी या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सिंह –
काही ठीक झालेले जुने आजार पुन्हा त्रासदायक ठरण्याची दाट शक्यता आहे. अल्टरनेटीव्ह उपचार पद्धतीने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. मधूमेही आणि अर्थ्राईटीसच्या रुग्णांनी या आठवड्यात औषधांच्या बाबतीत टाळाटाळ करणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे वेळेवर औषधं घ्या.
कन्या -
ग्रहांची प्रतिकुलता आरोग्याच्या समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरण्याची चिन्ह आहेत. काही जुन्या समस्या पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कॅल्शियमची कमतरता या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
तूळ –
तुमच्या राशीतील या आठवड्यातील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान सहान वाटणार्या समस्यादेखील या आठवड्यात वेळीच लक्ष न दिल्यास त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
वृश्चिक -
या आठवड्यात तुमची रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यास ग्रहांची मदत होईल. त्यामुळे आजारपण दूर राहतील. सांधेदुखीचा त्रास जाणवल्यास तात्पुरता आराम मिळवण्यासाठी क्रिम्स ( ऑईन्मेंट्स) फायदेशीर ठरतील परंतू दीर्घकाळ आराम मिळवण्यासाठी आहारात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.
धनू -
मधूमेहींनी आहाराचे पथ्य सांभाळणे आवश्यक आहे. अति गोडाचे पदार्थ खाणे, पिणे टाळा. नियमित चेकअप करून रक्तात कमी-जास्त होणार्या ग्ल्युकोजच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. श्वसानाचे काही त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करा.
मकर -
या आठवड्यात आरोग्यविषयक समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्रासदायक लक्षणं आढळताच त्यावर त्वरीत उपचार सुरू करा.
धनू -:
आरोग्यदायी राहण्यासाठी या आठवड्यात ग्रहांची पुरेशी साथ नाही. त्यामुळे अनपेक्षितरित्या काही समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्यावर त्वरीत वैद्यकीय उपाय सुरू करा. तसेच या आठवड्यात आरोग्यविषयक सजग रहा. लाईफस्टाईलमध्ये आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल करा.
मीन -
तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी ग्रहांची या आठवड्यात तुम्हांला उत्तम साथ आहे. लहान वाटत असल्या तरीही शारिरीक समस्यांकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे काही त्रास जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.