Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शेवग्याच्या भाजीचा आहारात समावेश कराल तर दूर होतील या ’6′समस्या !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

शेवगा बारमाही उपलब्ध असले तरीही चैत्र – वैशाखामध्ये शेवग्याच्या शेंगा अधिक लागतात. शेंगांप्रमाणेच पानांचा, फुलांचादेखील आहारात समावेश केला जातो. यामुळे हाडं सुधारतात, शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, कामवासना सुधारते तसेच शीघ्रपतनाची समस्या कमी होण्यास मदत होते. मग केवळ गोकुळाष्टमीदिवशी नैवद्याला शेवग्याची  भाजी न खाता नियमित आहारात त्याचा समावेश करण्याची ही कारणं नक्की जाणून घ्या.

1. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते –  

मधूमेहींसाठी शेवग्याची पानं अत्यंत फायदेशीर ठरतात. यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. शेवग्याच्या पानांमुळे अचानक रक्तातील साखर वाढण्याचा त्रासही कमी होतो.सोबतच मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय जरूर आजमावून पहा.

2. रक्तातील कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहते –

शेवग्याच्या पानांमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे अ‍ॅथरोस्लेरॉसिस आणि हायपरटेंशन ( उच्च रक्तदाब) यासारख्या समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !

3. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो –  

शेवग्याच्या पानांमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने पचनकार्य आणि शौच  साफ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे शेवग्याच्या पानांची पूड बद्धकोष्ठतेचा समस्येवर फायदेशीर ठरते.

4.  अ‍ॅन्टीऑक्सिडंट यांनी मुबलक –  

शेवग्याच्या पानांमध्ये फायटोकेमिकल्स मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास तसेच कार्डीयोव्हसक्युलर डिसिजेस आणि मधूमेहाचा त्रास कमी करण्यास मदत होते. यासोबतच या ’10′ पदार्थांमधून अ‍ॅन्टीऑक्सिडंटस मिळवा आणि तंदरुस्त रहा !

5.  दाहशामक क्षमता –

शेवग्याच्या पानांमध्ये दाहशामक क्षमता अधिक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीरातील दाह नियंत्रणात राहतो. मधूमेहाचा त्रास कमी होतो.

6. मासिकपाळीतील त्रास कमी होतो –

शेवग्यांच्या पानांमुळे मासिकपाळीच्या दिवसातील अनियमित रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच मेनेस्टुअल क्रॅम्प आणि पोटदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या वेदना हमखास दूर करणारे ’10′ नैसर्गिक उपाय !

References

1.Mbikay M. Therapeutic Potential of Moringa oleifera Leaves in Chronic Hyperglycemia and Dyslipidemia: A Review. Frontiers in Pharmacology. 2012;3:24. doi:10.3389/fphar.2012.00024.

2. NATURAL AND AYURVEDIC REMEDIES FOR ADOLESCENCE DYSMENORRHEA. Anuradha D. International Journal of Phytotherapy. Inter. J. of Phytotherapy. Vol 5, Issue 1,2015, 33-36.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>