Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’10′कारणांमुळे मनात येतात आत्महत्येचे विचार !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English 

कोणतीच व्यक्ती कायम मानसिकदृष्ट्या मजबूत राहू शकत नाही. काही वेळेस आयुष्यातील कठीण प्रसंगांच्या वेळेस आत्महत्येसारखे टोकाचे विचार मनात येतात. पण आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही. अशा प्रसंगांच्यावेळी त्या व्यक्तीच्या परिवारातील किंवा मित्र-मैत्रिणींनी सजग राहणे फायद्याचे ठरते. म्हणूनच काऊसलिंग सायकोलॉजिस्ट डॉ. गायत्री अय्यर यांनी सुचवलेली ही आत्महत्येमागील संभाव्य कारणं जरूर लक्षात ठेवा.

  • आत्महत्येचा विचार मनात येण्यामागील कारणं – :

1. नैराश्य -

डीप्रेशन/ नैराश्य यामुळे अनेक नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी अनेकजण जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात.

2.मानसिक धक्का -

आयुष्य बदलून टाकणारा एखादा प्रसंग़ जसे की घटस्फोट, जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक संकंट यासारख्या घटनांमुळे अनेकदा जीवन संपवण्याचा निर्णय घेतला जातो.

3.शोषण –

मानसिक,शारिरीक किंवा लैंगिक शोषणामुळे अनेकदा आत्महत्येचा विचार मनात येऊ शकतो.

4.लो सेल्फ एस्टीम -

अनेकदा एखाद्या व्यक्तीचा स्वतःवरील विश्वास कमी झाला तर आपोआपच सेल्फ एस्टीमही कमी होते. आपण काहीच करू शकत नाही या मानसिक दुर्बलतेच्या भावनेतून अनेकदा आत्महत्येचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

5.त्रास देणे - 

एखादी व्यक्तीला कामाच्या ठिकाणी किंवा घरी त्रास होत असल्यास त्याला कंटाळून अनेकजण टोकाचे निर्णय घेतात. काही वेळेस हुंड्यासारख्या अमानुष सामाजिक प्रथेसाठी स्त्रियांचा छळ होतो तर कधी लैंगिक छळाला कंटाळून जीवन संपवण्याचा विचार मनात येऊ शकतो.

6.बेकारी -

घरातील कमावत्या व्यक्तीवर नोकरी गमावण्याची वेळ आल्यास आर्थिक संकंटातून बाहेर पडण्यासाठी अनेकदा आत्महत्येचा विचार केला जातो. आर्थिक चणचण हे आत्महत्येमागील सर्रास आढळणारे एक कारण आहे.

7.लाज –  

आयुष्यातील एखादा लाजीरवाणा प्रसंग मानसिक खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरते. स्वतःच्या एखाद्या लाजीरवाण्या कृत्यामुळे आलेले दडपण आत्महत्येचे कारण ठरू शकते.

8.आजारपण –

दीर्घकाळ चालणारे आजारपण किंवा शारिरीक व्यंगत्त्व हे मनाचे खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरते. अशातून आपण घरातील व्यक्तींवर ‘आर्थिक बोजा’ वाढवत आहोत अशा भावना निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.

9.रिटायरमेंट –

आयुष्यभर कामाला जुंपलेल्या लोकांना त्यातून आनंद मिळतो. परंतू सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण काहीच कामाचे नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकते.

10.परिक्षेतील अपयश -

पालकांकडून किंवा शिक्षकांकडून पाल्यांवर येणारे दडपण अपेक्षित निकाल न मिळाल्यास वाढू शकते. यामधून अनेक लहान मुलं कोवळ्या वयात जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. नक्की वाचा कशी ओळखाल मुलांच्या मनातील आत्महत्येची लक्षणं ?

  • कसे ओळखाल तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मनातील ‘आत्महत्ये’चे विचार

# अति ताण किंवा थकवा जाणवणे - कायम विनाकारण थकवा जाणवणे किंवा सतत कंटाळवाणे राहणे हे एक ठळक लक्षण आहे.

# भूक मंदावणे - अचानंक जेवण कमी करणे, खाण्याची इच्छा कमी होणे.

उत्साहाने कशातच भाग न घेणे - प्रिय  व्यक्तीच्या सान्निध्यातून किंवा आवडत्या गोष्टींमधूनही सहभाग काढून घेऊन स्वतःच्या विश्वात राहणे.

# आशा कमी होणे - सतत अपयशाबाबत किंवा नकारात्मक गोष्टींबाबत बोलत राहणे. स्वतःचे जगणे निरूपयोगी असल्याचे सतत बोलून दाखवणे.

# झोप कमी होणे - आत्महत्येचा विचार करत असलेल्या व्यक्ती अत्येंत कमी किंवा खूप वेळ झोपून काढतात.

# आत्महत्येबाबत बोलणे - कधी मस्करीत तर कधी गांभीरतेने सतत आत्महत्येबाबत बोलणे हे त्यांचया मनातील विचार स्पष्टपणे बोलणे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका.  तात्काळ त्या व्यक्तीशी बोलून मन हलके करण्याचा प्रयत्न करा. किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घ्या.

( नक्की वाचा - ‘आत्महत्या’ करण्याचा विचार करण्यापूर्वी एकदा हा फोन नंबर फिरवा )

  • आत्महत्येपासून व्यक्तीला परावृत्त करण्याचे काही  मार्ग -

मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्याशी बोलून मन हलके करा.

आर्थिक चणचण असल्यास किंवा बेरोजगारीच्या समस्येमध्ये इतर पर्यायांची चर्चा करा.

एखाद्या आरोग्यदायी छंदामध्ये किंवा व्यायाम प्रकारामध्ये मन रमवण्याचा अधिक प्रयत्न करा.

आयुष्यातील नकारात्मक प्रसंगापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

मोकळेपणाने बोला म्हणजे मन हलके होण्यास मदत होईल.

मानसोपचार किंवा इतर मार्गाने मदत पोहचवण्याचा प्रयत्न करा.



Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>