छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
ऑटीझम, हा एक डेव्हलपमेंटल विकार आहे. त्यामुळे मेडीकल चाचण्या करून त्याचे निदान करता येत नाही. पालक बाळासोबत अधिक वेळ असतात. त्यांच्यात दिसणारी लक्षणं वेळीच ओळखल्यास ऑटीझमचे निदान लवकर करणे शक्य आहे. Sparsh for Children, a multidisciplinary therapy center for intellectually weak children च्या डिरेक्टर सौरभी वर्मा यांनी सुचवलेली ही लक्षणं वेळीच ओळखा तसेच ‘ऑटिस्टिक मुलांना सांभाळताना या ’6′ गोष्टी लक्षात ठेवा !
सहा महिन्यांपर्यंत : हास्य किंवा आनंदाच्या /प्रसन्नतेच्या कोणत्याच भावना चेहर्यावर न दिसणे.
नऊ महिन्यांपर्यंत : भावनांना फारसा प्रतिसाद न मिळणे. क्वचित स्वतःच्या विश्वात विनाकारण हसणं .
बारा महिन्यांपर्यंत : नावाने हाक मारूनही प्रतिसाद न देणे. हातवार्यांना, लडीवाळ बोलण्याला प्रतिसाद न देणं. उदा: बाजारात किंवा काही खरेदी करताना एखाद्या खेळण्याकडे बोट दाखवून हट्ट करण्यापेक्षा ते खेळणं पालकांच्या हातात देतात.
सोळा महिन्यांपर्यंत : फारसे न बोलणं. ऑटिस्टीक मुलं कविता, गाणी किंवा इतर गोष्टी पाठांतर करून बोलतात. पण दैनंदिन दिवसातील लहानसहान सवयींबाबत सांगत नाही. टॉयलेट किंवा भूक लागल्याचेही सांगू शकत नाहीत. अशी मुलं एकटेच राहणे पसंत करतात, त्यांना इतरांप्रमाणे कुशीत घेणं आवडत नाही. समोरच्या व्यक्तीशी क्वचित बोलतात. परंतू बोलताना नजर समोरच्यांच्या डोळ्यात नसते.
चोवीस महिन्यांपर्यंत : मुलं बोलताना त्यांच्या दोन वाक्यांमध्ये संगंती नसणे. एका विशिष्ट अॅक्टिव्हिटीमध्ये ते उत्तम असतील. तर त्याविषयक वस्तूंबाबत मुलांची अटॅचमेंटदेखील तितकीच तीव्र असते.
मुलांची वाढ होताना पालकांनी सजगतेने त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांची वागणूक, चालण्या-बोलण्याची पद्धत, संभाषण कौशल्य यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ऑटीझमच्या त्रासावर विशिष्ट औषध नाही. त्यामुळे जितक्या लवकर लक्षणं ओळखता येतील तितक्या लवकर त्याची तीव्रता रोखण्यास मदत होईल. वरीलपैकी काही लक्षणं आढळल्यास बालरोगतज्ञांची मदत घ्या.
ऑटीस्टिक मुलांची काळजी कशी घ्याल ?
स्वतःला त्यासाठी तयार करा – तुमचे मूल ऑटिस्टिक असेल तर ते स्पेशल होते. त्यामुळे सामान्य मुलं आणि त्यांच्यामधील फरक स्वतः समजून घ्या. ऑटीस्टिक मुलांचा विकास विशिष्ट पद्धतीने होतो. त्यामुळे त्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष द्या. इतर मुलांशी तुलना करण्यापेक्षा त्यांच्या फिजिकल, इमोशनल,सोशल, लिंग्विस्टिक वागणूकींच्या विकासाकडे लक्ष द्या.
प्रेम आणि वेळ द्या – ऑटीस्टिक मुलांना उपचारासोबत प्रेम अअणि मदतीची गरज असते. कुटूंबाची भक्कम साथ असल्यास अशा मुलांसाठी अनेक गोष्टी सुकर होतील. ऑटिस्टिक मुलं इतरांप्रमाणे मुद्दामुन व्रातपणे वागणार नाहीत.