मी सुदर्शन जांभळे( वय ३३) नवी मुंबईत राहतो. गेल्या काही दिवसांपासुन केस गळण्याची समस्या वाढत होती. यावर अनेक उपाय करुनही कोणताच फरक दिसत नव्हता. तेव्हा माझ्या एका डॉक्टर मित्राने एक घरगुती उपाय सुचवला. सहज सोपा असल्याने तो सुरक्षितही आहे. त्यामुळे मी तो निवडण्याचा निर्णय घेतला.
त्याने मला सुचवलेला उपाय होता मुलतानी माती आणि तिळाच्या तेलाचा हेअर पॅक. या हेअर पॅकसाठी आवश्यक असेल इतके तीळाचे तेल आणि ३ चमचे मुलतानी माती. हा पॅक तासभर केसांना लावुन ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एरंडेलतेल– केसांच्या सार्या समस्या दूर करणारा रामबाण उपाय !
या हेअर पॅकचा वापर करण्यासोबत आपल्या रोजच्या आहारातही बदल करावे. रोज सकाळी नाश्त्यासोबत एक कपभर दुध घ्यावे. त्यानंतर दुपारचे जेवण हे भरपुर करावे. त्यात काकडी,टमाटर आणि गाजर असा सलाडही घ्यावा. त्यानंतर रात्रीचे जेवण हे कमी घ्यावे. त्यात चपाती आणि भाजी घ्यावी. त्यासोबत फ़ळांचे सलाडही खावे. पण जंक फूड खाणे टाळावे. उघड्यावरचे किंवा हॉटेलचे खाण्याऐवजी घरचेच जेवण जेवावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसातुन ४ लिटर पाणी प्यावे. याच आहाराची सवय ठेवावी. केस गळती रोखणारा रामबाण घरगुती हेअर पॅक
तसेच या उपायासोबत नेहमीच्या सवयींमध्ये बदल करावा. सतत शॅंपू बदलु नका. केसांना जेल लावु नये. स्पायकींग करु नका. केस विंचरण्यासाठी बारीक दातांची फणी वापरु नये. तसेच आठवड्यातुन दोन वेळा केस धुवावे. बाईकवरुन जाताना डोक्याला केसांभोवती रुमाल किंवा कपडा बांधावा. हे वाचा केस गळती रोखणारा ‘वन मिनिट’ उपाय !
या सगळया गोष्टी योग्यपद्धतीने करत गेल्यास तुम्हाला फरक जाणवेल . मला या उपायाचा फायदा झाला त्याप्रमाणे तुम्हाला होईल असे वाटुन हा उपाय करण्यापुर्वी कॅलेंडर पाहा. एप्रिल फूल!!!
टीप: वरील उपायाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा फक्त एप्रिल फूल प्रॅंक आहे.