छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
उन्हाळ्याच्या दिवसात भूक मंदावते. फारसे खाणे होत नाही. मात्र शरीर हायड्रेटेड आणि सशक्त राहण्यासाठी पाण्यासोबतच आहारातही योग्य पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे. मसालेदार किंवा पूर्ण जेवणाऐवजी उन्हाळ्याच्या दिवसात सलॅड खाणे हे हलके-फुलके आणि पोटभरीचे आहे. नक्की वाचा - उन्हाळ्यात घ्या आस्वाद या ’5′ स्वादिष्ट अन अल्हाददायक सलाड्सचा !
काकडी ही उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते. काकडीतील 95% पाणी शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच यासोबत थंडगार दह्याचा समावेश केल्यास शरीराला प्रोटीनचादेखील मुबलक पुरवठा होतो. नक्की वाचा- जेवणात काकडीचे तुकड्यांचा समावेश केल्यास दूर होतील या ’10′ समस्या !
साहित्य -:
- 1 चिरलेली काकाडी
- 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो
- 1 टीस्पून चिरलेली कोथिंबीर
- 1/2 कप दही
- ½ चमचा जिर्याची पूड
- चवीपुरते मीठ
कसे बनवाल सलाड ?
चिरलेली काकडी, टोमॅटो आणि मिरची एका भांड्यामध्ये एकत्र करा. घट्ट दही घोटून एकजीव करा. त्यामध्ये जिर्याची पूड,मीठ घालून मिश्रण एकत्र करा. हळूहळू हे मिश्रण सलाडवर घाला. ते नीट एकत्र करा. सलाड पुदीना किंवा कोथींबीरींच्या पानांनी सजवा. हे सलाड थंडगार खाल्ल्यास अधिक स्वादीष्ट लागेल.