Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गव्हाचा रस –पिंपल्सचा त्रास दूर करणारा नैसर्गिक उपाय !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

तरुणांमध्ये हार्मोनल बदल होत असताना अ‍ॅक्ने ब्रेकआऊटचा त्रास वारंवार होतो. पिंपल्ससोबतच त्याचे डाग चेहर्‍यावर राहिल्याने सौंदर्य अधिकच बिघडते. पिंपलमुळे त्वचेवर लालसरपणा,खाज वाढणे किंवा डाग राहणे अनेकांचा आत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरतो. त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल आणि मळ अतिप्रमाणात साचून राहिल्यास अ‍ॅक्नेची निर्मिती होते. मात्र त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. ‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय ! तुम्हांला ठाऊक आहे का  ?

अ‍ॅक्नेचा त्रास दूर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही जण ब्युटीपार्लरमध्ये जाऊन उपचार घेतात तर काही त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे सोयीस्कर मानतात. परंतू कमी प्रमाणात अ‍ॅक्नेचा त्रास असणार्‍यांसाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपचार पद्धतीनेदेखील त्यावर मात करता येऊ शकते. नक्की फॉलो करा अ‍ॅक्नेची समस्या कमी करणारा खास डाएट प्लान !

गव्हाचा रस  हा असा एक उत्तम घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. वजन घटवण्यापासून ते अगदी मासिकपाळीदरम्यानचा त्रास कमी करण्यासाठी गव्हाचा ताजा रस फायदेशीर ठरतो. गव्हाच्या रसात मिनरल्स, कॅल्शियम, आयर्न,सोडियम,मॅग्नेशियम सोबतच व्हिटामिन ए, बी, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळते.

Panache Skin & Hair Clinic & Slimming Centre च्या डॉ.नम्रता भरंबे यांच्या सल्ल्यानुसार, गव्हाचा रस चेहर्‍यावर लावल्यास अ‍ॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे सूज आणि ब्रेकआऊटचा त्रास कमी होण्यास मदत होते. गव्हाच्या रसातील अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक एजिंगचा त्रास आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. तसेच त्वचा पुनरुज्जीवीत होण्यासाठी मदत होते.

गव्हाचा पातींचा रस सनटॅन कमी करण्यास मदत करतात. अशावेळी उन्हाळ्यात टॅनचा त्रास कमी करण्यासाठी गव्हाचा पातींचा फायदा ब्युटी क्रिम्स किंवा ट्रीटमेंटपेक्षा अधिक  होतो.

  • घरच्या घरी कसा बनवाल गव्हाचा रस ?

बाजारातही गव्हाचा रस किंवा पावडर सहज उपलब्ध असतो. याव्यतिरिक्त तुम्ही तो गव्हाचा पाती घरीदेखील लावू शकता. घरी गव्हाच्या पाती उगवून त्याचा रस तयार करणार असल्यास त्या पाती 7 दिवस जुन्या असाव्यात. पाती स्वच्छ धुवून पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटाव्यात.

  • अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी कसा वापराल गव्हाचा रस  ? 

गव्हाच्या पातींचा रस चेहर्‍यावर फेसमास्क प्रमाणे लावावा. कापसाचा बोळा चेहर्‍यावर फिरवून हळूहळू लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>