सलमान खानची बहिण अर्पिता खान हिने आज मुंबईत मुलाला जन्म दिला आहे. अर्पिता खानचा पती आयुष शर्मा याने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. ‘प्रतिक्षा संपली. आमचा राजकुमार ‘अहिल’ आला.’ असे ट्विट करून ही गोड बातमी सांगितली आहे.
मलाईका आणि अरबाज खानच्या विभक्त होण्याच्या चर्चांमुळे गेले काही दिवस खान कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण होते. अशातच खान कुटूंबियातील शेंडेफळ असणार्या अर्पिता खानने दिलेल्या या गोड बातमीने पुन्हा सेलिब्रेशन होणार आहे. दिग्दर्शक आणि सलमान खानचा मेव्हणा अतुल अग्निहोत्री यांनी नवजात बाळाचा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे.
Blessed moment pic.twitter.com/phO5WPncrF
— Atul Agnihotri (@atulreellife) March 30, 2016
आयुष शर्मा आणि अर्पिता खानचा विवाह 18 नोव्हेंबर 2014 रोजी हैद्राबाद येथे संपन्न झाला होता. आज खान कुटुंबियांमध्ये ‘अहिल’ या नव्या सदस्यांचे आगमन झाले आहे. त्यानंतर खान कुटुंबीयांसोबतच अर्पिता आणि आयुषवर सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.