Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मासिकपाळीच्या पहिल्या अनुभवाअगोदर मुलींना या ’5′गोष्टी नक्की सांगा !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

मासिकपाळीदरम्यान होणार्‍या त्रासामुळे अनेकींना ती त्रासदायक किंवा नकोशी वाटते. परंतू वास्तवात मासिकपाळी ही स्त्रीजीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यामुळे त्यांचा पहिल्यांदा अनुभव घेण्याआधी मुलींना मानसिक आणि शारिरीकरित्या सदृढ करणे गरजेचे आहे. महिन्यातील त्या 5 दिवसांदरम्यान त्यांच्या शरीरात होणारे बदल मोकळेपणाने त्यांना सांगणे गरजेचे आहे. म्हणूनच सायकोथेरपीस्ट डॉ. शाझनीन लिमजरवाला यांच्या मते प्रत्येक आईने तिच्या मुलीशी या ’5′ गोष्टी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे.

1. तिच्या प्रश्नांना शांतपणे उत्तरं द्या -: 

घरातील एखाद्या शांत ठिकाणी तिच्याशी बोला. मासिकपाळी सुरू होण्याआधी तिला त्या दिवसात होणार्‍या बदलांबद्दल पुरेशी माहिती द्या. सहाजिकच मासिकपाळीबद्दल  मुलींच्या मनात त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे संकोच न बाळगता त्यांच्या मनातील भीती कमी करा. ( नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!)

2. सॅनिटरी नॅपकीनची माहिती द्या -: 

मुलींना सॅनिटरी नॅपकीन कसे लावावे, वापरावे हे प्रत्यक्षपणे दाखवा. त्याच्या वापराबद्दल अपुरी माहिती किंवा स्वच्छतेची काळजी न  घेतल्यास त्रास होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे त्याबाबत त्यांना मोकळेपणाने सांगा. सॅनिटरी पॅड दिवसातून विशिष्ट वेळाने बदलणे स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ नेहमी एक एक्स्ट्रा पॅड ठेवायची सवय लावा. मासिकपाळीच्या दिवसात किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे? हे नक्की जाणून घ्या.

3.तिच्यासाठी ‘पिरीयड बॅग’ बनवा -: 

एका पिशवीत अंडरवेअर आणि पॅड एकत्र ठेवा. ही पिशवी नियमित त्यांच्या  दप्तरात ठेवायला द्या. यामुळे अचानक रक्तस्राव झाल्यास कपड्यांवर डाग पडणार नाहीत. तसेच अस्वच्छ अंडरवेअरचा घरी येईपर्यंत वापर करावा लागणार नाही. मासिकपाळी  ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारी एक अविभाज्य गोष्ट असल्याने त्याबाबत स्त्री शिक्षकेची मोकळेपणाने बोलून त्यांची मदत घ्या. यामुळे त्यांना मदत होईल.

 4. तिला अतिमाहिती देऊ नका -: 

स्त्री शरीरात होणारे बदल हे वयोमानानुसार होणे सहाजिकच असतात. हळूहळू प्रत्येकजण त्यांना बदलांना स्विकारतात. पण सुरवातीला लहान मुलींना कोणताही अनुभव नसताना अति माहिती दिल्यास त्या घाबरू शकतात. मासिकपाळीदरम्यानचा त्रास अटळ असला तरीही तो कमी करण्याबाबत माहिती द्या. पहिल्याच संभाषणात नकारात्मक किंवा अतिमाहिती देणे चूकीचे किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. मासिकपाळीदरम्यानचा त्रास हा सामान्य असतो. त्यामुळे या दिवसातही आनंद शोधण्याचे विविध पर्याय त्यांना सांगा.

5. मासिकपाळीच्या दिवसात स्वच्छता पाळायला शिकवा 

मासिकपाळीच्या दिवसात स्वच्छता ही आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते हे त्यांना वारंवार सांगा. सॅनिटरी नॅपकीनच्या योग्य वापरासोबतच ते कधी आणि कसे बदलावे? कसे टाकावे याबाबतही माहिती द्या. खूप वेळ  एकच सॅनिटरी नॅपकीन वापरल्यास त्वचेवर स्क्रिन रॅश किंवा इंन्फेक्शन येण्याची शक्यता असते.  त्यामुळे त्याचा वापरासोबत स्वच्छतेबाबत त्यांना प्रत्येक दिवशी सजग रहायला शिकवा.


 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>