Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डॅशिंग गोविंदा ‘राकेश बापट’ची एक्सक्लूझिव्ह फीटनेस सिक्रेट्स !!

$
0
0

आगामी ‘वृंदावन’ या चित्रपटातून राकेश बापट हा नवा डॅशिंग आणि हॅन्डसम हंक मराठीत पदार्पण करतोय. राकेशचा लूक जितका कूल आणि अनेकींना घायाळ करणारा आहे तितकेच त्याच्या फीटनेसचे फंडेही तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. वृंदावन चित्रपटासोबतच प्रत्यक्ष आयुष्यातही खाण्या-पिण्याच्याबाबतीत आणि स्वतःच्या फीटनेसबाबत चोखंदळ असणार्‍या राकेश बापटने ‘द हेल्थ साईट’ सोबत शेअर केलेली ही खास हेल्द सिक्रेट्स तुम्हीही नक्की जाणून घ्या.

  •  तुझ्या फीटनेससाठी काय विशेष प्रयत्न करतो ? 

‘मुंबईचं ट्राफीक आणि घाई-गडबडीचे जीवन पाहता जीममध्ये जाण्यापेक्षा घरीच वर्क आऊट करण्यावर माझा अधिक भर असतो. माझ्या घरातच जीमचं साहित्य आहे. त्यामुळे जीम ट्रेनर घरीच येऊन मला ट्रेनिंग देतो’ असे राकेश सांगतो. पण जीममध्ये घाम गाळण्यासोबतच हॉर्स राईडिंग, किक बॉक्सिंग, जॉगिंग आणि सायकलिंग सारख्या इतर अ‍ॅक्टीव्हीटीदेखील राकेशचा स्टॅमिना वाढवायला मदत करतात.

  • व्यायामाच्यादृष्टीने तुझा दिवस कसा सुरू होतो ? 

‘आजकाल  केवळ बॉडीबिल्डिंगकडे अधिक लक्ष दिल्याने अनेकजण कोअर मसल्सना मजबूत करण्याकडे दुर्लक्ष करतात. ते वाढवण्यासाठी माझं फंक्शनल ट्रेनिंगकडे अधिक भर असतो. ज्यामध्ये कार्डीओ, प्लॅन्क,ग्राऊंड वर्कआऊट यासारख्या प्रकारांमुळे पोटातील कोअर स्ट्रॉंग़ करण्याकडे माझा अधिक भर असतो’. असे राकेशचे मत आहे.  यासोबत सायकलिंगचे वेड असल्याने राकेशने चक्क पुणे – मुंबई प्रवासही सायकलवर केला आहे. व्यायामाच्या  सोबतीने पुरेशी आणि शांत झोपदेखील  गरजेची आहे. त्यामुळे 7-8 तास झोपणे गरजेचे आहे. तेव्हाच शरीर केलेल्या व्यायामाचे उत्तम निकाल देण्यासाठी सज्ज होते. असा त्याचा विश्वास आहे. (नक्की वाचा : टीनएजर्सनी जीममध्ये घाम गाळणे योग्य आहे का ? या वर काय सेलिब्रिटी फीटनेस ट्रेनरचा सल्ला )

  • ‘वृंदावन’मध्ये स्वतः स्टंट करण्यासाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागली ? 

वृंदावनमध्ये 40 मिनिटांचा टोटल अ‍ॅक्शन सिक्वेन्स आहे. ते फाईट सिन्स किंवा स्टंट्स स्वतः करण्यासाठी आणि ते खरे वाटण्यासाठी नक्कीच विशेष मेहनत घेतली गेली आहे. त्यासाठी सहा महिने स्ट्रेचिंग, बॉडी बॅलंस वाढवण्यासाठी राकेशने मेहनत घेतली आहे. यासाठी लहानपणापासून केलेली ट्रेकिंग़, रोप क्लॅम्बिंग़, रिव्हर क्रॉसिंग असे रोपशी निगडीत खेळ मला फार फायदेशीर ठरल्याचे राकेश सांगतो. ( नक्की वाचा : जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज ! )

  • विशेष डाएट फॉलो करतो का ? 

माझा हार्ड कोअर डाएटपेक्षा पिसमील खाण्यावर अधिक भर असतो. यामुळे ब्रेकफास्ट त्यानंतर दोन जेवणं असे ठराविक जेवण्यापेक्षा दर दोन तासांनी काही हेल्दी खाण्यावर अधिक भर असतो. साधरण दिवसाची सुरवात अंडी, दूध, ब्राऊन ब्रेड किंवा फळं असे खाऊनच होते.  त्यानंतरच्या आहारात हिरव्या भाज्या, फळं  यांचा प्रामुख्याने समावेश असतो. परंतू जंकफूड  आणि अति शिजवलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळण्याकडे राकेशचा अधिक भर असतो.

  • चीट डे असतो का ? 

चीट डे हा नक्कीच असतो. त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. मला गोड पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे पुरणपोळी, चॉकलेट्स आणि वरण भात यावर त्या दिवशी ताव मारला जातो.

  • अभिनेते किंवा मॉडल्सना आंधळेपणाने फॉलो करणार्‍या तरुणांना तू काय संदेश देशील ? 

प्रोटीन शेक किंवा स्टिरॉईड्च्या सहाय्याने बॉडी जितकी लवकर बनते तितक्याच लवकर त्याचे इफेक्ट्स जातातही. त्यामुळे  पुरेसा वेळ घेऊन शरीर  डेव्हलप  करण्याकडे अधिक भर द्या.

  • शारिरीक स्वास्थ्यासोबत मानसिक दडपण किंवा स्ट्रेस कसा हाताळतोस ? 

राकेश बापट हा नॅशनल अवॉर्ड विनिंग पेंटर आहे. त्यामुळे फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटींशिवाय शिल्पकला आणि चित्रकला ताण कमी करायला मदत करते. यावेळी मी एकटा आणि शांत असतो त्यामुळे हा छंद माझा स्ट्रेस बस्टर आणि थेरपीप्रमाणे काम करतो.  हॉर्स राईडिंग हा अजून एक माझा आवडता प्रकार असल्याचे राकेश सांगतो. घोड्यावर बसल्यावर मला मुक्त वाटतं  असे तो  सांगतो.

  • तुझा ‘वन मिनिट’ फीटनेस मंत्रा काय आहे ? 

उड्या मारणे. अनेकदा जेवल्यानंतर काम करताना कंटाळा येतो किंवा थकवा जाणवतो. अशावेळी पुन्हा एनर्जी आणण्यासाठी मी मिनिटाभरात  जितक्या शक्य होतील तितक्या उड्या मारतो आणि पुन्हा कामाला लागतो.

पहा ‘वृंदावन‘चा ट्रेलर – सौजन्य – झी म्युझिक मराठी


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>