Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मासिकपाळीच्या दिवसात किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे?

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

 मी 16 वर्षीय तरुणी असून, किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. मला पाच दिवस रक्तस्त्राव होत असला तरीही त्याचा प्रवाह वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा असतो. त्यामुळे माझे कंफ्युजन अधिक वाढते. 

मासिकपाळीच्या काळात होणारा त्रास, क्रॅम्स, पोटदुखी, ब्लोटिंग़ आणि रक्तस्त्रावाच्या अधिक प्रमाणामुळे स्त्रियांना हे पाच दिवस अनेकदा गैरसोयीचे वाटतात. यासोबतच रक्ताचे डाग कपड्यांना लागू नयेत म्हणून दक्ष राहताना नेमका  पॅड कितीवेळा बदलावा याबाबत अनेकींच्या मनात संभ्रम असतो. डाग पडण्याच्या चिंतेसोबतच मासिकपाळीच्या काळात स्वच्छता पाळणेदेखील आवश्यक आहे.

( नक्की वाचा : मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!)

मॅक्स हॉस्पिटल्स,नवी दिल्ली येथील सिनियर कन्सलटंट  डॉ. उमा वैद्यनाथन यांच्या सल्ल्यानुसार , मासिकपाळीच्या दरम्यान नियमित सॅनिटरी नॅपकीन न बदलल्यास ते फारच त्रासदायक ठरू शकते. यामुळे इंफेक्शन, रॅशेज होण्याची शक्यता असते. काही जणींना वेळीच पॅड न बदलल्यास टॉक्सिक शॉक सिंड्रोमचाही त्रास होऊ शकतो. वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय

सॅनिटरी नॅपकीन काही ठराविक वेळातच बदलण्याचे काही नियम नाहीत. मात्र पहिल्या तीन दिवसात रक्तस्त्रावाच्या प्रमाणानुसार आणि तुमच्या सोयीनुसार पॅड बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक पॅडची काही विशिष्ट क्षमता असते. त्यानुसार पॅड बदला. काही वेळेस ओव्हर फ्लो होत नसेल तरीही किमान सहा तासाने पॅड बदलणे गरजेचे आहे. नक्की पहा हा व्हिडीयो: कसा टाळाल मासिकपाळीच्या दिवसांतील त्रास !

चवथ्या, पाचव्या दिवशी रक्तस्त्रावाचे प्रमाण तुलनेत कमी असते. अशा वेळी दिवसात दोनदा किंवा तीनदा पॅड बदलणे पुरेसे आहे. डॉ. वैद्यनाथनच्या मते, चवथ्या पाचव्या दिवशी स्त्राव कमी होत असल्यास दिवसातून दोनदा पॅड बदलणे पुरेसे आहे. अनेकदा पाळीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रक्तस्त्राव अगदीच विरळ होतो. मात्र खात्री पटल्याशिवाय पॅड लावणे बंद करू नका. अनेकदा अचानक काही वेळेस सहाव्या दिवशी काही थेंब रक्तस्त्राव होऊ शकतो त्यामुळे आयत्यावेळी फजिती होण्यापेक्षा सुरक्षेचा उपाय म्हणून पॅड लावा. आणि रक्तस्त्राव होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पॅड काढा.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>