छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
मधूमेहाचे निदान झाल्यानंतर केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे पुरेसे नाही. परंतू यासोबतच मधूमेहातून वाढणारे गुंतागुंतीचे आजार नियंत्रणात ठेवणेदेखील गरजेचे आहे. मधूमेहातून रक्तदाब, हृद्यविकार तसेच किडनीविकार जडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मधूमेहाच्या रुग्णांनी या 7 चाचण्या अवश्य करून घेणे गरजेचे आहे. पण तुम्ही तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?
- HbA1C टेस्ट :
HbA1C टेस्ट रक्तातील साखरेच्या प्रमाणाबाबत अचूक आणि खोलवर माहिती देते. यामुळे डॉक्टरांना तीन महिन्यांतील उपाचारांबाबत तसेच त्याच्या निकालांबाबत तीन महिन्यांची माहिती मिळते.
- रक्तदाब :
डॉक्टरांकडे गेल्यानंतर नियमित ब्लड प्रेशर नियंत्रणात आहे का याबाबत चाचणी करून घ्या. नसल्यास आहाराचे पथ्यपाणी पाळून आणि औषधोपचाराने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. उच्च रक्तदाबाची थेट लक्षणं दिसत नाहीत. मात्र त्यामुळे हृद्यविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
- लिपिड प्रोफाईल :
लठ्ठपणा तसेच सतत बसून काम करण्याची सवय तुम्हांला असल्यास वर्षातून एकदा कोलेस्टेरॉलची चाचणी अवश्य करा. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण कोलेस्टेरॉल वाढवण्यासही कारणीभूत ठरू शकते. यामुळे हृद्यविकारांमधील गुंतागुंतदेखील वाढू शकते. त्यामुळे आहाराचे पथ्यपाणी, व्यायाम कटाक्षाने करा. यामुळे रक्तातील साखरेसोबतच कोलेस्ट्रेरॉलदेखील नियंत्रणात राहील.
- आय चेकअप :
रक्तातील साखर अचानक वाढल्यास त्याचा रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. तसेच यामुळे ग्ल्यायकोमा आणि मोतिबिंदूचा त्रास वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच प्रतिवर्षी डोळे तपासून घ्या तसेच चष्म्याचा नंबर वाढला आहे का हेदेखील तपासून पहा.
- किडनीच्या कार्याची चाचणी :
मधूमेहाच्या रुग्णांनी वर्षातून किमान एकदा किडनीचे कार्य सुरळीत चालते का ? याची चाचणी करून घ्या. रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण रक्तवाहिन्यांचे नुकसान करते. याच्या परिणाम मुत्रमार्गावर आणि किडनीवरही होतो. मधूमेहासोबत तुम्हांला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हा धोका अधिक बळावतो.
- नर्व्ह डॅमेजचे फिजीकल एक्झामिनेशन :
नर्व्हसचे नुकसान झाल्यास संवेदना कमी होणे, डायरिया,मूत्राशयावरील /ब्लॅडरवरील नियंत्रण कमी होणे, थकवा जाणवणे अशा समस्या आढळून येतात. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार सुरू करा.
- डेन्टल एक्झाम :
मधूमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास कॅव्हिटीज किंवा दात कमजोर होण्याची शक्यता वाढते. तसेच हिरड्यांचे आजारही वाढतात. त्यामुळे दर सहा महिन्यांनी मधूमेहींनी डेन्टिस्टकडे अवश्य जावे.
पोषक आणि संतुलित आहार, अॅक्टीव्ह लाईफस्टाईल आणि औषधोपचाराने मधूमेहाचे रोगी आरोग्यदायी जीवन नक्कीच जगू शकतात.