छायाचित्र सौजन्य –Getty Images
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
वयात आलेल्या मुलांमध्ये स्वतःच्या शरीराबाबत अनेक न्युनगंड असतात. वजन, त्वचा, केस ते अगदी पर्सनॅलिटीपर्यंत मुलांच्या मनात समज-गैरसमज असतात. ओव्हरवेट असणार्या मुलांमध्ये वजनाबाबत इतरांपेक्षा थोडा जास्तच न्यूनगंड असतो. वयानुसार शरीरात होणार्या हार्मोनल बदलांमुळे वजन वाढते. अशा दिवसांमध्ये फीट राहण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पण ‘जीम’ हा त्यावरील उपाय आहे का ? हे जाणून घ्या सेलिब्रिटी फीटनेस आणि डाएट एक्सपर्ट राधिका कार्ले यांच्याकडून थेट !!
- टीनएज मुलांनी जीममध्ये जावे का ?
टीनएज मुलांनी वर्कआऊट नक्की करावा मात्र त्यासाठी जीममध्येच जाणे गरजेचे नाही. वयात आल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे नक्कीच वजन वाढते. यासोबत जंकफूड किंवा कोला खाण्याची सवय असल्यास मुलं अतिलठ्ठ होण्याची शक्यता वाढते. या ’9′ पदार्थांमधील साखर वाढवतेय मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या !
- कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे मुलं फीट राहण्यास मदत होईल ?
अॅटीव्ह राहण्यासाठी अतिजड वजनं उचलू नयेत. पौगंडावस्थेतील मुलांचे शरीर एका विशिष्ट टप्प्यात असते. त्याची वाढ होत असते. त्यामुळे क्रन्चेस, पुश अप्स, चीन अप्स, डीप्स, प्लॅन्क किंवा स्वॅट्स यासारखे बॉडीवेट एक्सरसाईझ करावेत.
जीममध्ये कार्डीओ वर्कआऊट करण्यासाठी ट्रेडमील्स, क्रॉस ट्रेनर यासारख्या व्यायामांसाठी मशीनचा वापर करावा. पण हेवी वेट्स उचलू नयेत. त्यापेक्षा फ्लोअर एक्सरसाईज करा. ( नक्की वाचा : जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज ! )
माझ्या मते अशा मुलांनी स्विमिंग, योगा,डान्स एक्सरसाईज,सायकलिंग, धावणे अशाप्रकारचा व्यायाम करावा. अॅक्टीव्ह राहण्यासाठी तुम्ही तुमचा आवडता खेळदेखील खेळू शकता. ( नक्की वाचा : वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !)
- आठवडाभरात किती व्यायाम करावा?
टीनएज मुलांमध्ये मेटॅबॉलिझमचा रेट अधिक असतो. त्यामुळे ते नियमित व्यायाम करू शकतात. किंवा एक आड एक दिवस व्यायाम करू शकता. तासभर केलेली कोणतीही अॅक्टिव्हिटी फीट राहण्यासोबत मेटॅबॉलिक रेट सुधारायला मदत करतात.
- व्यायामासोबत कोणत्याप्रकारचे डाएट फॉलो करावे ?
टीनएज मुलांच्या आहारातून जंक -फूड पूर्णपणे टाळणे फार गरजेचे आहे. प्रोसेस्ड फूड खाणेदेखील फायदेशीर नाही. यामध्ये कॅलरीज अधिक आणि पोषणद्रव्य कमी प्रमाणात आढळतात. शरीराची पूर्ण वाढ होण्याच्या या ट्प्प्यावर पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम करत असल्यास प्रामुख्याने कॅलरीजची आवश्यकता असते.
पौगंडावस्थेतील मुलांचा आहार ताजा आणि संतुलित असणे गरजेचे आहे. तसेच आहारामध्ये प्रोटीन, कार्बयुक्त पदार्थ जसे की अंड, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, मासे, फळं, ड्रायफूट्स यांचा समावेश करा. नियमित दोन तासांनी काहीतरी खाणे गरजेचे आहे. यामुळे मेटॅबॉलिक रेट सुधारतो. पण प्रोटीन शेक पिणे कटाक्षाने टाळा.
- या वयात अति जीम केल्याने काय होते ?
वाढत्या वयात जीमिंग किंवा अवजड वजनं उचलल्याने शरीरावर दुष्परिणाम आढळून येतात. जिमिंगमुळे मसल्सचे नुकसान होते कारण शरीरात त्यातुलनेत प्रोटीन उपलब्ध नसते. त्यामुळे अधिकाधिक शारिरीक खेळ किंवा अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून स्वतःचा फीटानेस वाढवण्याचा प्रयत्न करा.
- नेमके कोणत्या वयात जीममध्ये जाण्यास सुरवात कराल ?
मुली वयाच्या विशीत तर मुलं 21-22 व्या वर्षांपासून जीममध्ये जाऊ शकतात. या वयापर्यंत त्यांच्या उंचीची वाढ पूर्ण झालेली असते.