Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्त्रियांमध्ये वाढणार्‍या केसगळतीमागे दडली आहेत ही ’10′कारणं !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

स्त्री शरीरात प्रत्येक टप्प्यावर काही बदल होत असतात. हे बदल केसांच्या आरोग्यावरही परिणाम करतात. यामुळे केसगळतीची समस्या वाढते. परंतू वेळीच केसगळतीचे मूळ कारण समजले तर त्यावर योग्य उपचार करणे सुकर  होते. म्हणूनच स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणार्‍या केसगळतीमागील ही ’10′ कारणं वेळीच जाणून घ्या.

#1 केसांची पुरेशी काळजी न घेणे -: 

केसांचे स्टाईलिंग करण्यासाठी स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न किंवा जेल, मूस,स्प्रे, कलर यासारखी उत्पादनं अति वापरल्याने केसांचे नुकसान होते. यामुळे केस निस्तेज होतात तसेच त्यांची वाढ खुंटते. खूप घट्ट पोनीटेल्स बांधणे, चुकीच्या पद्धतीने केस विंचरणे यामुळेदेखील केसगळतीची समस्या  वाढते. ट्रायकॉलॉजिस्ट डॉ. अपूर्वा शहा यांच्या मते, केसांना अतिप्रमाणात रंग़ लावल्यानेदेखील केसांचे नुकसान होते.  चुकीच्या प्रकारे केस विंचरल्याने तुमच्या केसांचे नुकसान होतयं म्हणूनच येथे क्लिक करा आणि  जाणून घ्या योग्य पद्धत !

#2 पीसीओएस (poly-cystic-ovarian-syndrome) -: 

पीसीओएसचा त्रास असलेल्या स्त्रियांमध्ये ,मेल हार्मोन्स किंवा एंड्रोजेंस यांचा प्रवाह वाढतो आणि तो ओव्हरीजमध्ये साचून राहतो. त्याला क्रिस्ट म्हणतात. शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात. शरीरावरील अनावश्यक केस अधिक वाढत असले तरीही टाळूवरील केसांची पुरेशी वाढ होत नाही.

#3 अ‍ॅनिमिया -: 

आहारात आयर्नच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाचा त्रास वाढतो. काही स्त्रिया किंवा मुलींमध्ये मासिकपाळी दरम्यान होणार्‍या रक्ताच्या अतिस्त्रावामुळे तसेच फ़ॉलिक अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाचा त्रास वाढतो. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनच्या निर्मितीचे कार्य मंदावते. परिणामी अवयवांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहचत नसल्याने ते कमजोर होऊन तुटण्याची शक्यता वाढते.  म्हणूनच आहारात टाळू नका हे ’7′ आयर्नयुक्त पदार्थ !

#4 मोनोपॉज -: 

मोनोपॉजच्या काळात स्त्री शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. त्यापैकी एक म्हणजे केसगळतीची समस्या. मोनोपॉजच्या काळात स्त्री शरीरातील इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते. या काळात केस शुष्क होतात तसेच पुरेशी काळजी न घेतल्यास केसगळती वाढते. केसांची पुरेशी वाढ होण्यासाठी माईल्ड शाम्पू आणि कंडीशनरचा वापर करा. या डाएट टीप्सने कमी करा ‘मोनोपॉज‘चा त्रास !

#5 प्रसुतीनंतर -: 

गरोदरपणानंतर अनेक स्त्रियांमध्ये केसगळतीची समस्या वाढते. गरोपणाच्या काळात शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते. यामुळे केसांची वाढही उत्तमप्रकारे होते.  पण प्रसुतीनंतर हार्मोन्स पुन्हा आपल्या मूळ स्थानी जातात परिणामी केसगळती वाढते. परंतू ही केवळ तात्पुरती स्थिती आहे. काही आठवड्यानंतर केसांची वाढ पुन्हा नियमित होते.

#6 प्रोटीन डेफिशिएन्सी -: 

आपले केस केराटीन या प्रोटीन घटकांमुळे होतात. आहारात पुरेसे प्रोटीन रिच अन्नपदार्थ नसल्यास केस कमजोर होतात. परिणामी केस गळतात. स्नॅक टाईमसाठी 8 हेल्दी प्रोटीनयुक्त पदार्थ

#7 औषधोपचार -: 

बर्थ कंट्रोल पिल्स घेण्याचा एक दुष्परिणाम म्हणजे केसगळती. बर्थ कंट्रोल पिल्स अचानक घेणे बंद केल्यास केसगळती वाढू शकते. अशाच काही इतर हार्मोनल पिल्स घेतल्यास त्याचा केसांवरही परिणाम दिसून येतो. केमोथेरपीमुळेदेखील केसगळती होऊ शकते.

#8 अतिप्रमाणात वजन घटवणे -: 

झटपट वजन घटवण्याचे उपाय, क्रॅश डाएटींग याचा परिणाम केसांवरही होतो. डाएटींग करताना अनेकदा काही पदार्थ कटाक्षाने खाणे टाळले जाते. यामुळे डाएटच्या नादात केसगळतीची समस्या वाढते. डाएटचं खूळ वाढवतंय ‘टीबी’चा धोका!

#9 ऑटोइम्यू किंवा थायरॉईडचे विकार -: 

थायरॉईडच्या आजारामध्ये काही विशिष्ट हार्मोन्स शरीरात कमी – जास्त प्रमाणात प्रवाहीत केले जातात. यामुळे तयार होणारी गुंतागुंत केसगळती वाढवण्यास कारणीभूत ठरते. ऑटोइम्यू आजारांमध्येही शरीरात काही अ‍ॅन्टीबॉडीजची निर्मिती होते. त्याचा केसांवर आणि इतर अवयवांवरही थेट हल्ला होतो. परिणामी केसग़ळतीची समस्या वाढते.

#10 काही विशेष शारिरिक समस्या -: 

मधूमेह, सोयरासिस यासारख्या आजारांमध्येही केसगळतीची समस्या वाढते. मधूमेहामध्ये शरीरात रक्ताभिसरणाची प्रकिया क्रिया मंदावते. परिणामी केस कमजोर होतात. सोयरासिस हा एक त्वचाविकार असून यामुळे टाळू आणि हेअर फॉलिकल्सचे आरोग्य कमजोर होते.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Latest Images

Trending Articles



Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>