Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

त्रिफळा चूर्ण –अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर रामबाण घरगुती उपाय !

$
0
0

           Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

                     आपले केस कायम काळेभोर आणि चमकदार राहावेत असे प्रत्येकालाच वाटते. परंतू ताणताणाव, चिंता आणि वाढत्या वयानुसार केस अकाली पांढरे होतात. मग त्याला लपवण्यासाठी मेहेंदी / हीनाचा पॅक लावला जातो, हेअर कलर केले जातात किंवा अगदी उपटून तोडले जातात. उतरत्या वयात केस पांढरे होणे हे अगदीच नैसर्गिक आहे. परंतू आजकाल तरुणांमध्ये केस अकाली पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मग ही समस्या लहान वाटत असेल तरीही हाताबाहेर जाण्याआधी त्यावर नैसर्गिक उपायांनी मात करा. हिना सोबतच ‘त्रिफळा चूर्ण’देखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कसे ठरते त्रिफळा चूर्ण फायदेशीर ? 

हरड, बेहडा आणि आवळा यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे त्रिफळा. या आयुर्वेदीक मिश्रणाने बद्धकोष्ठता तसेच पचनाचे विकार दूर होण्यास मदत होते. परंतू त्यासोबत अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका होते. यामधील व्हिटामिन सीमुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रादूर्भाव कमी होण्यास मदत होते. परिणामी केसांची वाढ सुधारते.

अकाली केस पांढरे होण्यामागे मिनरल्सची कमतरता तसेच हार्मोनल बदलही कारणीभूत ठरतात. त्रिफळा चूर्णामध्ये आयर्न, पोटॅशियम सारखे मिनरल्स आढळतात. यामुळे केसांची वाढ सुधारते तसेच केसगळती रोखण्यास आणि अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णामुळे शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते. तसेच टाळूला होणारा रक्तप्रवाह सुधारतो. घरगुती तेलाच्या मिश्रणानेदेखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते. 

कसा कराल हा उपाय ? 

  1. एक टीस्पून त्रिफळा पावडर एक टेबलस्पून खोबरेल किंवा बदामाच्या तेलामध्ये मिसळा. हे मिश्रण एकत्र करून उकळा. 2-3 मिनिटे मिश्रण उकळल्यानंतर ते एकजीव होण्यास मदत होते.
  2.  तीन मिनिटे मिश्रण उकळल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्या.
  3. केसांना आणि त्वचेला सोसवेल इतके तेल कोमट झाल्यानंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.

अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून किमान दोन वेळा करा. या त्रिफळा चूर्णामुळे केसातील कोंडा, टाळूवरील खाज कमी होण्यासही मदत होते.

References

  1. Dweck, A. C. (2002). Natural ingredients for colouring and styling. International journal of cosmetic science, 24(5), 287-302.
  2. Gaud K. Sharangadhara – samhita – Sharangadharacharya virachita (14th Cen. A.D.) Lucknow: Tejjkumar; 1967. p. 419. Chapter 2(9):161,162.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles