Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हद्याला अधिक ‘हेल्दी’बनवतो गाजराचा ग्लासभर रस !

         Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

             आहारावर आरोग्य अवलंबून असते. हृद्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात असणारे गाजर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासोबत हृदयालादेखील स्वास्थ्यकारक ठेवण्यास मदत करतात. वजन घटवण्यासाठी डाएटचे गणित आरोग्यदायी पद्धतीने बनविले असल्यास गाजर तुमचे ‘वेट लॉस’चे मिशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यास नक्कीच मदत करते. परिणामकारक वजन घटवतील ही ’15′ घरगुती ड्रिंक्स

न्युट्रीशन जर्नल 2011 च्या अहवालात प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसर 480 मिली ताज्या गाजराचा रस नियमित प्यायल्यास अ‍ॅन्टीऑक्सिडंटचे प्रमाण वाढते. गाजरामध्ये नायट्रसचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते आणि रक्ताभिसरणाचे प्रमाण सुधारते. गाजराचा आहारात समावेश करताना तो सलाड किंवा रोज सकाळी ग्लासभर रसाने होऊ शकतो. त्यासाठी काही गाजराचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये लिंबाचे काही थेंब आणि मीठ मिसळा. यासोबतच हृद्याचं आरोग्य सुधारतील ही ’11′ हेल्दी ड्रिंक्स !

कार्डियोव्हास्क्युलर सिस्टीमचे रक्षण करण्यासोबतच गाजराचा रस रक्तदाबावरही नियंत्रण मिळवण्यास मदत करते. गाजराच्या रसाचे नियमित सेवन केल्यास किमान 5% रक्तदाब कमी होण्यास मदत होते. गाजरामध्ये असलेली पोषणद्रव्यं, फायबर, पोटॅशियम, नायट्र्स आणि व्हिटामिन सी हळूहळू रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही गाजराचा रस बीटरूटच्या रसामध्ये किंवा इतर काही फळांच्या रसामध्ये मिसळू शकता. गाजराच्या सेवनाने केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

References

[1] Potter AS, Foroudi S, Stamatikos A, Patil BS, Deyhim F. Drinking carrot juice increases total antioxidant status and decreases lipid peroxidation in adults.Nutrition Journal. 2011;10:96. doi:10.1186/1475-2891-10-96.

[2] Agudo A, Cabrera L, Amiano P, Ardanaz E, Barricarte A, Berenguer T, Chirlaque MD, Dorronsoro M, Jakszyn P, Larrañaga N, Martínez C, Navarro C, Quirós JR, Sánchez MJ, Tormo MJ, González CA, Am J Clin Nutr. 2007 Jun; 85(6):1634-42.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>