Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Getty Images
केस सतत किंवा जोरात विंचरल्याने ते तुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे केसांचे नुकसान होते. रात्री झोपण्यापूर्वी किमान 100 वेळा केस विंचरणे गरजेचे आहे हा केवळ गैरसमज आहे. तुम्ही कसे आणि किती वेळ केस विंचारता यावर केसांचे आरोग्य अवलंबून असते. काहींच्या मते सतत केस विंचरत राहिल्यास ते अधिक हेल्दी राहतात आणि त्याची चमक टिकून राहण्यास मदत होते. हे पूर्ण चूकीचे नसले तरीही नेमके केस कसे विंचरावेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
सतत केस विंचरणे फायदेशीर आहे का ?
केस विंचरणे हे मसाज करण्याप्रमाणेच असते. यामुळे टाळू तसेच केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.
- केस विंचरल्यामुळे टाळू जवळील नसांना चालना मिळते. टाळूवरील सुधारलेला रक्तप्रवाह ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यास मदत करते. यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते.
- केस विंचरल्यामुळे सेबमची निर्मीती करणार्या ग्रंथींना चालना मिळते. यामुळे केस आणि टाळू मॉईश्चराईज्ड राहतो. तसेच यामुळे टाळूवरील त्वचेची pH व्हॅल्यू नियंत्रित राहण्यास मदत होते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते.
- केस विंचरल्याने केसांचे कंडिशनिंग राहण्यास मदत होते. फणीने केस विंचरताना टाळूवरील तेल केसांच्या टोकांपर्यंत येते. यामुळे नैसर्गिकरित्या केसांना कंडीशनिंग मिळते.
- केस विंचरल्यामुळे टाळूवरील डेड स्कीन मोकळी होण्यास तसेच बाहेर पडण्यास मदत होते. तसेच टाळूवर खाज येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
- केस डी-टॅंगल होतात. त्यामुळे केस तुटण्यापासूनदेखील बचावतात.
दिवसातून किती वेळ केस विंचरणे योग्य आहे ?
हेअर एक्सपर्टसच्या मते, अति केस विंचरल्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे काही विशिष्ट प्रमाण नाही. त्यामुळे तुम्ही 20,50 किंवा 100 वेळा केस विंचरू शकता. हे केसांच्या पोतावर अवलंबून आहे. केस योग्य प्रकारे विंचरणे गरजेचे आहे. ते रात्री किंवा सकाळी विंचरणे आवश्यक आहे असे काही नाही. मात्र खूप जोरात केस विंचरणे टाळा. केस गुंतले किंवा मेसी झाले असल्यास तेल लावून केस विंचरा.
खूप वेळा केस विंचरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. तसेच टाळूवरदेखील इजा होण्याची शक्यता असते. शुष्क केस सतत विंचरल्यास त्याचे नुकसान अधिक होते. त्यामुळे केस सतत विंचरताना या गोष्टीची काळजी अवश्य घ्या.
केस नीट विंचरण्यासाठी खालील गोष्टी अवश्य लक्षात ठेवा -:
- लाकडाची फणी वापरा. त्याचा वापर अधिक सुरक्षित असतो.
- रफ किंवा गुंतलेले केस मोकळे करण्यासाठी, विंचरण्यासाठी सेरम किंवा तेलाचा वापर करा.
- केस गुंतलेले असल्यास ते विंचरताना प्रथम खालच्या टोकांकडून सुरवात करा.
- ओले केसदेखील विंचरा. त्यामुळे नुकसान होत नाही.