मेष -:
या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून तुम्हांला एखादी समस्या त्रास देत असल्यास त्यावर वेळीच उपचार करा. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार सुरू करा आणि रक्तदाब आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान सहान समस्यांवर कायमचे उपचार करण्यासाठी काही अल्टरनेटीव्ह उपचारांची मदत घ्या.
वृषभ -:
श्वसनाशी निगडीत समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा. सांधेदुखीचा त्रास असणार्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कॅल्शियलयुक्त फळं आणि भाज्या आहारात ठेवल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल. मध्यमवयीन आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित इवनिंग वॉक केल्यास तुमचे स्वास्थ्य सुधारायला मदत होईल.
मिथून -:
तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती पाहता, या आठवड्यात व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. तशी लक्षणं आढळताच वेळीच त्यावर उपाय करा. रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या आठवड्यात अपघाताची शक्यता आहे.
कर्क -:
तुम्हांला जुनाट किंवा दीर्घकाळ एखाद्या समस्येचा त्रास होत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. सांध्यांचे दुखणे कमी करण्यासाठी त्यावर वेळीच उपचार करा. शारिरीक समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार करा.
सिंह -:
आरोग्याच्या समस्यांवर तात्काळ मात करणे आवश्यक आहे. पित्ताच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा. हा त्रास अंनेक दिवस होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता औषधोपचारांनी त्यावर मात करा.
तूळ -:
या आठवड्यात व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्हांला ताप येण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हांला काही दिवस सक्तीचा आराम करणे गरजेचे आहे. अस्थमा, सांधेदुखी यांचा त्रास असणार्यांनी औषाधांच्या वेळांमध्ये टाळाटाळ करणे टाळा.
वृश्चिक-:
रक्तदाबाचा त्रास असणार्या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. औषाधांच्या वेळा टाळू नका. मधूमेहींना या आठवड्यात चिंतेची गरज नाही. मात्र खाण्याचे पथ्य पाळा. साखरेचे,गोडाचे पदार्थ टाळा. तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल करा.
धनू -:
राशीतील ग्रहमान पाहता, अनेक दिवसांपासून चालणार्या समस्यांवर या आठवड्यात रामबाण औषध मिळण्याची शक्यता आहे. मात्र मंदावलेली पचनशक्ती या आठवड्यात चिंतेचे कारण ठरू शकते. त्यावर काही अल्टरानेटीव्ह उपचारांनी मात करण्याचा प्रयत्न करा.
मकर -:
राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहान सहान समस्यांकडेदेखील दुर्लक्ष करणे या आठवड्यात त्रासदायक ठरू शकतो. श्वसनाशी निगडीत समस्यांना असणार्यांना या आठवड्यात काळजी घेणे आवश्यक आहे. श्वसनविकारांचा त्रास होत असल्यास तात्काळ उपचार सुरू करा.
कुंभ -:
अतिश्रमाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ राखून आराम करा. तसेच काही त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. जुन्या व्याधींवर तात्काळ उपचार करा.
मीन -:
हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी राहील. सर्दी-खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. पचनाचा काही त्रासा जाणवल्यास तात्काळ उपचार सुरू करा. अन्यथा काही दिवस तुम्हांला कमकुवतपणा जाणवेल. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा.