Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’8′मार्गाने नकळत आहारात वाढते मीठ !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Getty Images

तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना हृद्यविकारापासून दूर ठेवण्यासाठी आहारात मीठ जरा जपूनच वापरता ? मग केवळ तेवढे पुरेसे नाही. सोडियम इतरही काही पदार्थांमधून तुमच्या शरीरात / आहारात येऊ शकते. आहारातील मीठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पाळा ही ’5′ गुपितं क्युमबला हिल्स हॉस्पिटल्सच्या डाएटीशन निती देसाई यांच्या सल्ल्यानुसार, आहारातील या पदार्थांच्या अतिसेवनामुळेदेखील मीठ अधिक वाढू शकते.

1. पापड आणि लोणची : आहारात चवीपुरता लोणची आणि पापडाचा जेवणाच्या पानांत समावेश केलेला असतो. परंतू त्यामधून शरीरात सोडीयम शरीरात जाते. तसेच त्यासाठी लागणारे तेल धोका अधिक वाढवतात. चमचाभर लोणच्यामधून दिवसभरातील सोडीयमच्या आवश्यकतेपेक्षा (2.5 ते 3 मिली ग्रॅम) अधिक शरीरात जाते. जेवणासोबत  नेहमी पापड खाण्याची सवय रक्तातील सोडीयमचे प्रमाण अधिक वाढवते.

2. सॉस : हेल्दी सलाड ड्रेसिंगपासून टोमॅटो केचअप आणि अगदी सोया सॉसपर्यंत सर्वत्र सोडीयम आढळते. अशा सॉसमधून सोडीयम कमी केले तर चवही कमी होते. त्यामुळे पास्ता सॉस किंवा सलाडवरचे ड्रेसिंग तुमच्या आहारातील मीठ नक्कीच वाढवतात.

3.चायनीज जेवण :  चायनीज पदार्थांमध्ये सोडीयमचे प्रमाण अधिक  आढळते. चायनीज सॉसच्या सोबतीने, करीज आणि सूप्समध्येदेखील त्यांना अधिकाधिक चविष्ट करण्यासाठी मीठाचा अधिक वापर केला जातो.

4. पॅकेज फूड : कॅन फूड किंवा रेडी टू इट पदार्थांमध्ये तसेच साठवलेल्या माशांमध्ये मीठाचा वापर अधिक प्रमाणात केलेला असतो. अधिक दिवस टिकून रहावेत  म्हणून सोडीयमचा वापर प्रिझरव्हेटीव्ह म्हणून केला जातो.

5. बेक्ड प्रोडक्ट्स : बेकरीमध्ये तयार केले जाणारे अनेक पदार्थ हे गोड असतात असे वाटत असले तरीही त्यामध्ये सोडीयमचा वापरदेखील तितक्याच प्रमाणात केलेला आढळतो. तुमच्या आहारात जितके बेकरी प्रोडक्स अधिक तितके साखर-मीठाचे कॉम्बीनेशन शरीरावर घातक परिणाम करतात. घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे

6. दुग्धजन्य पदार्थ : चीझ,बटर आणि मार्गारिंझ यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आहारात त्याचा समावेश जरा सांभाळून करणेच गरजेचे आहे.

7. प्री-पॅकेज सूप्स किंवा सॅलेड : अशा पदार्थांना हेल्दी संबोधले जात असले तरीही त्यामध्ये कॅलरी आणि मीठाचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे अशी पाकिटं विकत घेण्याऐवजी घरीच हेल्दी सूप बनवा.

8.चिप्स : कपभर चहासोबत चिप्स किंवा खारावलेले काजू, शेंगदाणे तुम्ही सहज संपवतात. पण त्यातील अतिरिक्त मीठाचे प्रमाण हृद्यासोबतच इतर अवयवांचेदेखील नुकसान करतात.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>