Source: IANS
Image and Video source: Aur Dikhao
आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अदांसाठी हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेली सनी लिओनी आता एक सामाजिक संदेश घेऊन आपल्यासमोर आली आहे. तारुण्यात व्यसनांचा मोह होणे हे वयानुसार स्वाभाविक असले तरीही त्याच्या आहारी न जाणे हे आपल्याच हातात आहे. नाक्यावर उभे राहून सिगारेट पिणे हे अनेकांना ‘कूल’ वाटत असले तरीही सिगारेट पिणे हे शारिरीक स्वास्थ्यासाठी हानीकारक ठरते. सिगारेटच्या व्यसनाचा आरोग्याप्रमाणेच सेक्सलाईफवर होणारा दुष्परिणाम तुम्हांला ठाऊक आहे का ?
‘अजतागायत सिगारेट कधीच न ओढलेल्या तरूणांना त्याबद्दल आकर्षण नक्कीच असेल. परंतू हे व्यसन फारच घातक असल्याने सिगारेट उचलण्याआधी विचार नक्की करा ‘ असा सल्ला ’11 minutes’ या अॅन्टी-स्मोकिंग अॅड फिल्मच्या प्रदर्शनावेळी सनी लिओनीने तरुणाईला दिला आहे. ’11 minutes’ नावाच्या धुम्रपानाच्या विरोधी अॅड फिल्ममध्ये सनी लिओनी, अभिनेते आलोक नाथ, ‘तनू वेड्स मनू’ फेम दीपक दोब्रियाल हे कलाकार आहेत. तर या फिल्मचे दिग्दर्शन विभू पुरी यांनी केले आहे.
’11 minutes’ या अॅड फिल्ममधून सिगारेटचा झुरका तुमच्या आयुष्याची दर 11 मिनिटे कशी कमी करते याबाबत सांग़ते.
धुम्रपान हे शरीरासाठी घातक व्यसन आहे. या व्यसनाने माझ्या वडीलांचा घात केला. सिगारेटमुळे झालेल्या कर्करोगाने माझ्या वडिलांचे निधन झाल्याचे सनी सांगते. ‘ लोकांनी धुम्रपानाचा त्याग करून आनंदी आणि आरोग्यदायी रहावे. दुर्देवाने आपण लोकांवर धुम्रपान करू नये यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. मात्र किमान आपल्या आसपास धुम्रपान न करण्याचा सल्ला मात्र देऊ शकतो. सरकारी इमारती किंवा रेस्ट्रॉरंट्च्या आवारात धुम्रपानावर बंदी घालणे हे यावर आळा घालण्याची पहिली पायरी नक्कीच ठरू शकते. असे मत सनी लिओनीने व्यक्त केले आहे. मैत्री, प्रेम आणि सिगारेट … नकळत व्यसनात ओढल्या गेलेल्या तरूणाची खरी संघर्ष कहाणी !
सनी लिओनीने या कार्यक्रमाच्या वेळी पहिल्या धुम्रपानाच्या अनुभवाबद्दल सांगितले. तिच्या मते,’ धुम्रपानाचा पहिला अनुभव फारच त्रासदायक आणि विचित्र होता. सिगारेट माझ्यासाठी आनंददायी नव्हती आणि भविष्यातही कधीच नसेल’. तसेच माझ्या सोबत काम करणार्या सह कलाकारांनादेखील सिगारेटचे व्यसन असल्यास त्यांना माझ्यापासून दूर जाऊन सिगारेट पिण्याचा सल्ला देत असल्याचे सनी सांगते. कारण सिगारेट इतकेच सिगारेटचा धूरदेखील इतरांसाठी घातक आहे.