Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य –Getty Images
चेहर्यावरील डाग, अॅक्ने किंवा खड्डे अशा त्वचासमस्या लपवण्यासाठी मेकअपची मदत घेतली जाते. मात्र तेलकट त्वचा असणार्या आणि पिंपल्सची समस्या असणार्या अनेकांना मेकअप करणे त्यांचा त्रास अधिक वाढवण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरते. या सहज-सोप्या पद्धतीने ओळखा तुमच्या त्वचेचा पोत.
मेकअपमुळे त्वचेवरील छिद्रांचा त्रास अधिकच वाढतो आणि ब्रेकआऊट्सची समस्याही वाढते. परंतू म्हणून पिंपल्सचा त्रास असणार्यांनी मूळीच मेकअप करू नये असे काही नाही. कॉसमेटॉलॉजिस्ट नंदीता दास यांनी तुमच्यासाठी शेअर केलेल्या या खास टीप्समुळे चेहर्यावरील डाग लपवण्यास मदत होईल सोबतच त्रास कमी करण्यासही नक्कीच फायदेशीर ठरेल. मग लक्षात ठेवा या ’4′ खास टीप्स
1.ऑईल फ्री प्रिमर वापरा:
मेकअप करण्यापूर्वी चेहर्यावर ऑईल फ्री प्रिमर लावा. यामुळे चेहर्यावरील अतिरिक्त तेल शोषले जाईल. तसेच त्वचेवर नितळ बेस तयार होईल. यामुळे त्वचेवरील असमानता कमी कमी होण्यासही मदत होईल. तेलकट त्वचेच्या लोकांनी वापरावेत असे 5 उपयुक्त फेसवॉश
2. अॅक्नेशी सामना करणार्या फाऊंडेशनची निवड करा:
काही फाऊंडेशनमध्ये लेनॉलिन आणि मिनरल ऑईल आढळते. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होऊन ब्रेकआऊटची समस्या वाढते. त्यामुळे ‘झिरो पोअर क्लॉगिंग’ फाऊंडेशनची निवड करा. त्यामुळे अॅन्टी अॅक्ने घटक असलेल्या फाऊंडेशनची निवड करा. म्हणजे चेहर्यावरील डाग, अॅक्नेची समस्या वाढणार नाही. त्यामुळे घाईगडबडीत फाऊंडेशन न निवडता त्यावरील लेबल नीट वाचा. ग्लायकोलिक (glycolic )किंवा सॅलिसायक्लिक (salicylic) अॅसिड असणार्या फाऊंडेशनची निवड करा. तसेच तेलकट त्वचेच्या समस्या दूर करतील ही ’6′ तेलं !
3. स्वच्छ मेकअप ब्रशची निवड करा :
चेहर्यावर मेकअप लावताना हातांचा वापर करण्याऐवजी स्वच्छ ब्रशची निवड करावी. हातावर अतिरिक्त तेल, बॅक्टेरिया यांचा छुपा वावर असण्याची शक्यता असते. मात्र ब्रशचा वापर केल्यास त्याचा चेहर्याशी थेट संपर्क होणार नाही. तसेच मेकअप ब्रश आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा स्वच्छ करा. ब्रशवर राहिलेला मेकअप हा घाण व तेलासाठी वाढण्याचे कारण ठरू शकते. अशा ब्रशने मेकअप केल्यास त्वचेवर संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. ‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय !
4.हलक्या स्ट्रोकचा वापर करा :
ब्रशच्या सहाय्याने चेहर्यावर मेकअप करताना हलक्या हाताचा वापर करा. जोर-जोरात ब्रश चेहर्यावर घासला गेल्यास त्वचेचे नुकसान होते. तसेच ब्रेकआऊटची समस्यादेखील वाढते.