Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

प्रत्येक जखमेवर बॅन्डेज लावणे सुरक्षित आहे का ?

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य : Shutterstock

तुम्हांला काही जखम झाल्यास तर डॉक्टरांना न विचरता ताबडतोब बॅन्डेज लावले जाते. आजकाल बाजारात बॅन्डेंज विविध स्वरूपात, कार्टूनच्या आकारात उपलब्ध आहेत. त्यामुळे लहान मुले देखील ती लावून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण प्रत्येक जखमेवर बॅन्डेंज लावणे हे योग्य किंवा सुरक्षित नाही.

जनरल फिजिशियल, डॉ. अल्का उल्लाल यांच्यामते, जखमेची तीव्रता आणि स्वरूप यावर बॅन्डेज लावावे का हे ठरवले जाते. त्यामुळे जर लहानशी जखम असल्यास मेडीकेटेड बॅन्डेज लावा. तर काही जखमा हा गंभीर असल्यास त्यावर  बॅन्डेंज लावण्याऐवजी योग्य ड्रेसिंग आणि अ‍ॅन्टीबायोटिक्स लावा. भळभळत्या जखमेमुळे रक्त वाहत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जर तुम्हांला खरचटले असल्यास प्रथम ती जखम वाहत्या पाण्याखाली स्वच्छ करा. सुती कापडाने हलकेच टिपून त्यावर बॅंन्डेज लावा. बॅन्डेज लावण्यापूर्वी साबण किंवा डिसइंन्फेक्शन सोल्युशन लावून जखम स्वच्छ करा. लहान जखमांमध्ये अ‍ॅन्टीबायोटिक ऑईनमेंट,पावडर लावल्यास स्क्रिन इंफेक्शनचा धोका कमी होतो.  ( नक्की वाचा : लहान-मोठ्या जखमांवर कसे कराल घरच्याघरी औषध ? )

बॅन्डेज वापरण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या –: 

  • जर जखम तीव्र आणि  खोल असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही वेळेस योग्य ड्रेसिंग आणि टाके घालण्याची गरज असते.
  • खिळा, कॉपर वायर, काचेचा तुकडा यामुळे जखम झाली असल्यास अ‍ॅन्टी टेटॅनस इंजेक्शन जरूर घ्यावे. यामुळे इंफेक्शन पसरण्याची भीती कमी होते.
  • काही वेळेस जखमेमध्ये पस (पू) जमा होण्याची शक्यता असते. यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांकडून ती जखम स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे.
  • भाजण्यावर, तीव्र जखमांवर, सतत वाहणार्‍या जखमांवर घरगुती उपय करण्याऐवजी डॉक्टरांच्या उपचारांची मदत घ्या. भाजल्यानंतर या ’5′ गोष्टी मूळीच लावू नका
  • काही जखमांवर डॉक्टर अ‍ॅन्टीबायोटीक्स औषध-गोळ्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र ती स्वतः निवडून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. कारण प्रत्येकालाच त्या औषधांची गरज असतेच असे नाही.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>