Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्तहिक राशीभविष्य आरोग्याचे (22 -28 फेब्रुवारी )

$
0
0

मेष -: 

या आठवड्यात पचनाचे विकार  त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने त्याकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. घरगुती जेवणाचा आहारात समावेश करा. बाहेरचे खाणे पूर्णपणे टाळा. रात्रीच्या जेवणात जंकफूड टाळा. तसेच फीटनेस वाढवण्यासाठीनियमित व्यायाम करा.

वृषभ -: 

तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता, या आठवड्यात व्हायरल इंफेक्शनचा धोका अधिक आहे. पचनक्रिया बिघडल्याने काही दिवस आराम करणे गरजेचे ठरेल. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं आणि आहाराची निवड करा. अपघाताने काही इजा होण्याची दाट शक्यता आहे.

मिथून -: 

मंदावलेली पचनशक्ती या आठवड्यात त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करा. अन्यथा गंभीरता वाढण्याची दाट शक्यता आहे. अस्थमा सारखे श्वसनविकार असल्यास विशेष काळजी घ्या. धूळ,धूर असणार्‍या ठिकाणी जाणे टाळा. जीवनात सकारात्मक बदल आणि पोषणयुक्त आहाराचा समावेश करा.

कर्क -: 

या आठवड्यात राशीतील ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. सर्दी- खोकल्याच्या समस्येवरही तात्काळ उपचार करा. आरोग्य  गृहीत  न धरता त्याला सुधारण्यासाठी नियमित किमान हलका व्यायाम करा.

सिंह -: 

या आठवड्यात कमकुवत पचनशक्ती चिंतेचे कारण बनू शकते. त्यावर तात्काळ उपाय करणे आवश्यक आहे. राशीतील ग्रहमान पाहता, या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगासनं करा.

कन्या -: 

या आठवड्यात व्हायरल इंफेक्शनचा धोका अधिक आहे. त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा. उच्चरक्तदाब, मधूमेहासारख्या  रुग्णांनी वेळेवर  वैद्यकीय चाचण्या करून स्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे  आहे.

तूळ -: 

या आठड्यात तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती  आरोग्यास पुरक नाही. त्यामुळे स्वास्थ्याकडे  विशेष लक्ष द्या. शरीराक्डुन मिळणार्‍या लक्षणांकडे कानाडोळा करू नका. त्यावर आरोग्याच्या कुरबुरींवर  मात करण्यासाठी वेळीच उपचार सुरू करा. निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम करा.

GaneshaSpeaks-Logo1

वृश्चिक -: 

जुन्या व्याधी त्रासदायक ठरू नयेत म्हणून त्याच्यावर वेळीच ठोस उपचार सुरू करा. अन्यथा इतरांसाठी हा आठवडा स्वास्थ्यकारक आहे. मात्र म्हणून आरोग्य गृहीत धरू नका. दीर्घकाळ आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.

धनू -:

या आठवड्यात मंदावलेली पचनशक्ती त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच नियमित सकाळी काही श्वसनाचे व्यायाम करा. तीव्र  दातदुखी या आठवड्यात तुम्हांला हैराण करू शकते. त्यावर  डेन्टिस्टकडून उपचार करून घ्या.

मकर -: 

या आठवड्यात श्वसनाचे विकार त्रासदायक ठरू शकतात.त्यावर  उपाय करण्यासाठी तज्ञ डॉकटरांची मदत घ्या. रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच औषधाच्या वेळा आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ -: 

या आठवड्यात इंफेक्शनचा धोका अधिक आहे. त्यामुळे शरीराकडून त्यासंबंधित कोणतेही संकेत आढळल्यास वेळीच  उपचार करा. जुन्या व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. नियमित मेडीकल चेकअप करा. तसेच काही त्रासादायक आढळल्यास त्वरीत उपचार सुरू करा.

मीन -: 

तुमच्या राशीतील सूर्याचा प्रभाव आरोग्यविषयक चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे पचनविकार वाढण्याची  दाट शक्यता आहे. तसेच श्वसनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>