Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बनाना न्युट्रीस्नॅक –रात्री अवेळी लागणार्‍या भूकेवर सुरक्षित उपाय !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य : Shutterstock

निरोगी स्वास्थ्यासाठी रात्री आठच्या सुमारास जेवून लवकर झोपण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला नियमित पाळणे जरा कठीणच आहे.लवकर जेवल्याने काहीवेळेस झोपण्याआधी पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते. अशावेळी काही अरबट खाण्याऐवजी फळं खाणं सोयीस्कर ठरते. पण  हे ”  हेल्दी पदार्थ खाणेदेखील रात्री  त्रासदायक ठरू शकते. पण झट्पट तयार होणारा ‘बनाना न्युट्रीस्नॅक’ अशावेळी खाणे योग्य ठरते. रात्री झोपण्यापूर्वी टाळा हेल्दी पण तरीही त्रासदायक ’7′ पदार्थ

बनाना न्युट्रीस्नॅक -:

बनाना न्युट्रीस्नॅकमध्ये केळं, दही, मध  यासोबत काही मसाले आणि हर्ब्स असतात. यामुळे भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. केळ्यामध्ये मेलॅटोनीन आणि सेरोटोनीन हार्मोन्स आढळते. यामुळे झोप येण्यास मदत होते. तर मधामुळे अलर्टनेस वाढवणारे ‘ओरॅक्सिन’ या न्युरोट्रान्समीटरचे कार्य कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रात्री बनाना न्युट्रीस्नॅक खाणे शांत झोप मिळवण्यासाठी मदत करते. शुद्ध आणि भेसळयुक्त मधातील फरक ओळखा अन वेळीच धोका टाळा 

मग पहा कसे बनवाल बनाना न्युट्रीस्नॅक -

साहित्य 

  • एका पिकलेल्या केळ्याचे काप
  • एक छोटा कप दही
  • 2-3 थेंब लिंबाचा रस
  • 1 टेबलस्पून मध
  • 1/2 टेबलस्पून मोहरीची पूड
  • 1-2 टीस्पून चिरलेली कोथिंबीर
  • चवीपुरता मीठ

कृती -: 

एक मध्यम आकाराच्या बाऊलमध्ये केळ्याचे काप, दही, मध, मोहरीची पूड, कोथींबीर, मीठ आणि लिंबाचा रस हे सारे साहित्य एकत्र करून घ्या. रात्री दही खाणे खरंच त्रासदायक ठरते का ?

टीप -: 

रात्रीच्या वेळेस हलक्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. पचायला जड पदार्थ  किंवा भरपेट जेवल्यास पचन मार्गात अडथळा आल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. यावर मात करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तासभर आधी बनाना न्युट्रीस्नॅक खावे. तसेच शांत झोप मिळाण्यासाठी या ट्रिक्स नक्की वापरून पहा.

With inputs from Dr Swati Dave, Nutritionist and Dietician, Ahmedabad.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>