Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
रात्रीच्या वेळी झोप येत नाही म्हणून टीव्ही पाहणे, इंटरनेटवर सर्चिंग करणे किंवा मोबाईलवर खेळून वेळ घालवला जातो. यामुळे पित्ताच्या त्रासासोबतच अनेक शारिरीक समस्या वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच या नैसर्गिक उपायांनी निद्रानाशेच्या समस्येवर मात करा. औषधोपचारांपेक्षा ‘गुलाबाच्या पाकळ्या’देखील फायदेशीर ठरतात. अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी खालेल्या पदार्थांमुळे झोप कमी होण्याची शक्यता असते. म्हणूनच हे पदार्थ खाणे टाळा.
गुलाबाच्या पाकळ्या कशी देतात झोप ?
शरीर आरामदायी बनवण्यासाठी तसेच मन शांत करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या मदत करतात. यामध्ये अॅन्टीडिप्रेसंट, अॅन्टीस्पॅसमोडिक, क्लेन्जिंक तसेच हायप्नोटिक क्षमता असतात. झोप येण्यासाठी दिल्या जाणार्या ड्रग्ज पेक्षा गुलाबातील हायप्नोटिक घटक अधिक गुणकारी असतात. यामुळे मन आणि स्नायू शांत होण्यासाठी मदत होते. परिणामी झोप येण्यास मदत होते. तसेच प्राचीन काळी रात्री झोपण्यापूर्वी गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास चांगली स्वप्न पडण्यास मदत होते असा म्हटले जात असे. तुम्हाला किती तास झोपेची नेमकी गरज आहे हे जाणून घेण्यासाठी या क्विझमध्ये नक्की सहभाग घ्या.
मग कसा कराल हा उपाय ?
रात्री झोपण्यापूवी उकळत्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या घालून वाफ घ्या. तुम्हांला आवडत असल्यास झोपण्यापूर्वी रोझ-टी प्या. किंवा तुम्ही उकळत्या दुधामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिसळूनदेखील पिऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी कपाळावर रोझ इसेंशियल ऑईलने मसाज करा. यामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल परिणामी शांत मिळण्यास मदत होईल. शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर
Reference
Shafei, M. N., Saberi, Z., & Amini, S. (2011). Pharmacological effects of Rosa damascena. Iranian Journal of Basic Medical Sciences, 14(4), 295-307.