Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक राशिभविष्य आरोग्याचे ( 15 – 21फेब्रुवारी)

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मेष -: 

तुमच्या राशीचे ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे या आठवड्यात आरोग्याची अवश्य काळजी घ्या. पचनाशी निगडीत समस्यांवर तात्काळ उपचार करा. त्यासाठी लाईफस्टाईल आणि आहारात सकारात्मक बदल करा.

वृषभ -: 

आठवड्याच्या मध्यापासून काही शारिरीक समस्या त्रासदायक ठरायला सुरवात होऊ शकेल. त्यामुळे व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच त्याची लक्षण आढळताच तात्काळ त्यावर उपचार सुरू करा.  सर्दी- खोकल्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गरज वाटल्यास एक- दोन दिवस घरीच आराम करा.

मिथून -:

या आठवड्यात अनपेक्षितपणे अपघात  होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. औषधोपचार  आणि वैद्यकीय चाचण्या करण्याकडे दुर्लक्ष करू नका. योगा आणि ध्यानसाधनेने तुमचा फीटनेस वाढवण्याचा प्रयत्न करा.

कर्क -: 

या आठवड्यात काही शारिरीक समस्या त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी प्रतिबंधक उपाय वेळीच करा. अस्थमा किंवा मधूमेहासारखे त्रास असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल करा. घातक व्यसनांचा वेळीच त्याग करा.

सिंह-: 

पचनसंस्थेतील बिघाड आणि पित्ताचा त्रास या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्टरनेटीव्ह उपचारपद्धतीने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा. सकाळी किंवा संध्याकाळी थोडावेळ चाला.

कन्या -:

या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तापामुळे तुमची तब्येत नरम गरम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस आराम करा. डॉक्टरांचा सल्ला आणि उपचारांसोबत योगा आणि ध्यानसाधना करा. यामुळे फीटनेस सुधारायला मदत होईल.

तूळ -: 

या आठवड्यात सर्दी-खोकल्यासारखे लहानसहान आजार तुम्हांला त्रासदायक ठरू शकतात. मात्र या आठवड्यात आरोग्य चिंतेचा विषय नाही. मात्र मधूमेह, रक्तदाब यासारख्या जुन्या व्याधींकडे तसेच औषधांकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक -: 

या आठवड्यात ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तसेच व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधक उपाय करा. स्वास्थ्य सुधारण्यासाठी संध्याकाळी चालायला जा.

GaneshaSpeaks-Logo11

धनू-: 

हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अगदीच स्वास्थ्यकारक आहे. मधूमेहींनी आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. ठाराविक दिवसांनी नियमित वैद्यकीय चाचण्या करून समस्यांवर नियंत्रण ठेवावे. अपघाताने इजा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहनं सावधानतेने चालवा. स्वयंपाकघरात कामं जपून करा.

मकर -: 

अचानक अपघाताने शरीराच्या खालच्या अवयवांना दुखापत होण्याची शक्यता आहे. पचंनसंस्थेतील बिघाड या आठवड्यात चिंतेची बाब ठरू शकते. आरोग्यविषयक सम्स्यांवर मात करण्यासाठी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगा किंवा ध्यानसाधनेचा अभ्यास करा.

कुंभ -: 

या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. पण तरीही स्वास्थ्याबाबत दक्ष रहा. लहानसहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या राशीतील ग्रहांचा प्रभाव पाहता, जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

मीन-: 

सूर्याचा तुमच्या राशीवरील प्रभाव पाहता,आरोग्याच्या कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ उपचार करा. तसेच औषधांच्या वेळा टाळू नका.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>