जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला की सारं सुरळीत होतं असे म्हटले जाते. पण सोबतीने एक ‘जादू की झप्पी’ दिली की आपण थोडा आनंद पसरवायला मदत होते हे ‘मुन्नाभाई’ने आपल्याला शिकवले आहे. पण हे फक्त त्या सिनेमापुरते मर्यादीत नसून खरंच आरोग्यदायी असल्याचा सल्ला होप अॅन्ड केअर सेंटरच्या सल्लागार डॉ. अल्का चढ्ढा यांनी दिला आहे. मिठी दिल्याने अनेक समस्यांना दूर ठेवण्यासोबतच तुम्हांला आनंदी ठेवण्यास मदत होते. पण ही मिठी किमान आठ मिनिटं असावी, कारण यादरम्यान शरीरातून बाहेर पडणार्या हार्मोन्सना तितका वेळ लागतो.
#1. स्नायूंवरील ताण कमी होतो :
आजकाल अनेकांची कामं ही एकाच ठिकाणी बसून कॉम्प्युटर किंवा फाईलमध्ये करायची असतात. यामुळे शारिरीक हालचाल कमी होते परिणामी स्नायूंवर ताण वाढतो. हा ताण कमी करण्यासाठी औषध घेण्याऐवजी ‘मिठी’ देणं अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे ताण हलका होण्यास मदत होते.
#2. सख्य वाढवायला मदत होते :
तुमच्या प्रियजनांसोबतचे सख्य वाढवण्यासाठी मिठी देणे हा एक सोपा उपाय आहे. यामुळे मन आणि शारिरीक ताणदेखील हलका होतो. मिठी दिल्याने ‘ऑक्सिटोसिन’ हार्मोन निर्माण होते. हे हार्मोन बाळाचा जन्म होतानादेखील निर्माण होते ज्यामुळे आई आणि नवजात बालकामध्ये बॉन्ड तयार होतो.
#3. रक्तदाब कमी करते:
मिठी मारल्यानंतर एंडॉरफिन म्हणजे आपल्याला आनंदी ठेवणारे हार्मोन्स तसेच ऑक्सिटोसिनचा रक्तातील प्रवाह सुधारतो. यामुळे रक्ताप्रवाह सुरळीत झाल्याने रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
#4.दाह कमी होण्यास मदत होते:
रक्तातील दाह वाढल्याने हृद्यविकार, मधूमेह, हार्ट अॅटॅक येण्याची समस्या वाढते. पण मिठी दिल्याने या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते. रक्तातील घातक घटक दुर होतात. परिणामी फ्री रॅडिकल्समुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत होते.
#5. ताण कमी होतो :
ज्यावेळेस तुम्हांला खूपच दु:खी किंवा निराशाजनक वाटत असेल तेव्हा तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा. यामुळे कोर्टिसॉलच्या निर्मीतीचे प्रमाण कमी होते. परंतू सेरोटोनीन या ताण कमी करणार्या हार्मोनला चालना मिळते.यामुळे तुम्हांला प्रसन्न वाटते. यामुळे चेतासंस्थेला चालना मिळते, मेंदूचे कार्य सुधारते तसेच मानसिक संतुलन सुधारल्याने सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते.
#6. सामंजस्य सुधारते:
दोन व्यक्तींमधील सामंजस्य सुधारण्यासाठी ‘मिठी’ अत्यंत फायदेशीर ठरते. मिठी दिल्याने मेंदूला सकारात्मक उर्जा मिळते पण त्यासोबतच ताण हलका झाल्याने मन प्रसन्नही राहते. तरूण मुला-मुलींची घरातील वडीलधारी व्यक्तींशी काही वादविवाद झाल्यास तो ताण कमी करण्यासाठी काही वेळाने एकाने पुढाकार घेऊन मिठी द्यावी. म्हणजे न बोलताच त्या दोघांमधील ताण-तणाव दूर होऊन पुन्हा एकमेकांमधील प्रेम वाढायला मदत होते.
#7. विश्वास वाढतो :
समोरच्या व्यक्तीला मिठीत घेतल्यानंतर एकमेकांमधील ‘इमोशनल कनेक्ट’ सुधारण्यासही मदत होते. यामुळे एकमेकांवरील प्रेम,विश्वास आणि सामंजस्य सुधारायला मदत होते. मिठी मारल्याने प्रियजनांमध्ये तुमच्याबाबत सकारात्मक वलय तयार होण्यास मदत होते.
#8. अॅन्टी-एजिंगचा त्रास कमी होतो :
मिठी मारल्याने आनंद, प्रसन्नता वाढवणारे हार्मोन्स वाढण्यास मदत होते, ताण हलका होतो. याचा परिणाम तुमच्या त्वचेवर प्रामुख्याने दिसून येतो.त्यामुळे मिठी मारल्याने वाढणारे चेहर्यावरील तेज अॅन्टी एजिंगची समस्या थोडी कमी करण्यास मदत होते.