रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने तुम्ही वारंवार आजारपणं येणं शारिरीक आणि आर्थिकदृष्ट्यादेखील तुम्हांला कमजोर करते. मग यावर एक सोपा आणि पारंपारिक उपाय म्हणजे तुळस ! नियमित सकाळी मध-लिंबू पाणी पिणेदेखील फायदेशीर आहे.पण यासोबतच तुळशीची पानं चघळल्याने नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते असे डॉ. रविंद्र इंगळे – आर्यन हॉस्पिटल्स आणि वोकहार्ट हॉस्पिटल्सचे जनरल फिजिशियन सांगतात.
- का आहेत तुळशीची पानं फायदेशीर ?
तुळशीची पानं इम्यू मॉड्युलरप्रमाणे काम करतात. तुळशीच्या पानामधील घटक शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे घातक आजारांना कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस यांचा नाश करण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्या सेल्सच्या निर्मीतीस मदत करतात. तुळशीच्या पानांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक असल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्सचा नाश करण्यास मदत होते. अतिरिक्त ऑक्सिडेशनमुळे होणारे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत होते. ‘Journal of Ethnopharmacology’ च्या अहवालानुसार तुळशीच्या पानांमुळे ‘T cytokines’ ,’ T lymphocytes’ यासारख्या इम्यु सेल्सचे संसर्गापासून रक्षण होते.परिणामी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. या औषधी गुणधर्मासोबतच तुळशीमध्ये लपले आहेत सौंदर्यवर्धक गुणधर्म
कसा कराल हा उपाय ?
रिकाम्यापोटी सकाळी 3-4 ताजी तुळशीची पानं चघळा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. पानं स्वच्छ धुऊन मगच चघळा. त्यानंतर ग्लासभर पाणी प्यावे. त्यानंतर किमान तीस मिनिटे काहीही खाणे टाळा. हा प्रयोग नियमित सकाळी उठल्या-उठल्या रिकाम्यापोटी तुळशीची पानं खावीत. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते.
Reference:
Mondal, Shankar, et al. ‘Double-blinded randomised controlled trial for immunomodulatory effects of Tulsi (Ocimum sanctum Linn.) leaf extract on healthy volunteers.’ Journal of ethnopharmacology 136.3 (2011): 452-456.