14 फेब्रुवारी – व्हेलेंटाईन डे
…………………………………………………………………………..
व्हेलेंटाईन डे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ‘त्या’ खास व्यक्तीला तुमच्या मनातील भावना मनमोकळेपणाने सांगण्यासाठी तुम्ही आतुर आहात ना? मग घाईत किंवा टेंन्शनच्या नादात काही चूका होण्याची शक्यता असते. म्हणूनच यंदाचा ‘व्हेलेंटाईन’ स्पेशल आणि थोडा परफेक्ट करण्यासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने काही खास टीप्स शेअर केल्या आहेत. मग तुम्ही त्या जरूर लक्षात ठेवा. तसेच तुमच्या आवडत्या कपलचा ‘व्हेलेंटाईन’ स्पेशल करण्यासाठी आम्हांला त्यांचा फोटो आणि त्यांच्या हटके लव्हस्टोरीबाबत सांगा आणि मिळवा एक सरप्राईज गिफ्ट !!! या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
#1 मुलींची फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवावी ?
खूप तारीफ म्हणजे काहीतरी गडबड ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. आपलं कौतुक व्हावं असे प्रत्येकालाच वाटतं पण पहिल्याच भेटीत अवास्तव कौतुक धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे अशा मुलाची निवड जरा पारखूनच करा. या क्विझमध्ये सहभागी व्हा आणि पहा कोण आहे तुमचा यंदाचा सेलिब्रिटी व्हेलेंन्टाईन
#2 मुलींनी लक्षात ठेवाव्यात अशा मेकअप किंवा ब्युटी टीप्स
व्हेलेंटाईन डे हा खास आहे म्हणून ग्लॅमरस बनून जाणं किंवा खूप मेकअप करणं टाळा. प्रेझेन्टेबल आणि कम्फरटेबल कपडे घालून जा. व्हेलेंटाईननंतर पुन्हा भेटाल तेव्हा हीच ती मुलगी होती का ? जिला आपण त्यादिवशी भेटलो असा प्रश्न पडेल इतका मेकअप करून जाणे टाळा. (नक्की वाचा : ब्युटी विथ ब्रेन तेजस्विनी पंडीतची एक्सक्लुझिव्ह ब्युटी सिक्रेट्स )
#3 गिफ्ट्सची निवड कशी कराल ?
मुलांना खूप लव्ही-डव्ही गिफ्ट आवडत नाहीत. त्यामुळे तुम्हांला काय आवडतं त्यावरून मुलांच्या गिफ्टची निवड करू नका. खूप भडक गिफ्ट्स घेणे टाळा. त्यापेक्षा त्यांची आवडनिवड लक्षात घेऊन गिफ्ट निवडा.
#4 सौम्यपणे प्रपोजल नाकारण्यासाठी सुरक्षित कारणं कोणतं ?
घरातले हे मान्य करणार नाहीत किंवा आमच्याकडे प्रेमप्रकरण स्विकारले जात नाही हे कारण अगदीच सुरक्षित आहे. कसं सांगाल त्याला की, तो तुमचा ‘Mr. Right’ नाही.
#5 लीव्ह इन रिलेशनशिपबद्दल तुझे काय मत आहे ?
प्रार्थना ‘लीव्ह इन रिलेशनशीप’ बाबत अगदीच न्युट्रल आहे. या पर्यायाबाबत मी सजगपणे विचार करून मगच निर्णय घेईन. त्यामुळे व्यक्तीसापेक्ष प्रत्येकाने फायद्या-तोट्यांचा विचार करून या पर्यायाची निवड करावी. यामध्ये चूक – बरोबर असे काही नाही.
# आयडियल डेड ?
मला समुद्र खूप आवडतात असे प्रार्थना सांगते. त्यामुळे शांत समुद्रकिनारी रोमॅंटीक वॉक ही माझ्यासाठी आयडियल डेट असेल असे प्रार्थना बेहरे सांगते.