Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तांदूळ आणि दह्याने वाढवा त्वचेचे सौंदर्य !

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

   छायाचित्र सौजन्य : Shutterstock

त्वचा निस्तेज आणि शुष्क होते तेव्हा तुम्हांला मॉईश्चरायझिंग बॉडी स्क्रब करण्याची गरज असते. बाजारात अनेक स्क्रबर्स उपलब्ध आहेत मात्र नैसर्गिक स्क्रबर वापरणे हे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. तसेच यामुळे केमिकलमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. दही आणि तांदूळ हे भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळते. त्वचेचा पोत सुधारण्यास हे दोन्ही घटक अत्यंत फायदेशीर आहेत. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यासही मदत होते. पायांच्या भेगा लपवण्यासाठी  मध आणि तांदळाचा पॅक फायदेशीर ठरतो.

कसा बनवाल हा स्क्रब ?

  • कपभर लांब शिताचे तांदूळ  किंवा बासमती तांदूळ गरम पाण्यात चार तासांसाठी भिजवत ठेवावा.
  • त्यानंतर पाणी गाळून एका स्वच्छ आणि सुती कापडावर तांदूळ  पसरून ठेवावे.
  • कापडाने पाणी शोषून घेतल्यानंतर तांदूळ कोरडे होतात तसेच नखांनी सहज तुटतात.
  • तांदळाचे दाणे बाऊलमध्ये घाला व त्यामध्ये अर्धा कप जाड दही घ्या. काहीवेळ दह्यामध्ये तांदूळ भिजू द्यावेत.
  • थोड्यावेळाने यामध्ये 3-4 थेंब लव्हेंडर ऑईलचे थेंब मिसळावेत.
  • तयार मिश्रण  नीट एकत्र केल्यानंतर तुमचा घरगुती स्क्रबर तयार होईल.

नक्की वाचा – त्वचा मुलायम करणारा घरगुती उपाय 

कसा वापराल हा स्क्रबर 

  • तयार स्क्रबर शरीरभर पसरा आणि हळूहळू मसाज करा. 2-3 मिनिटे असा मसाज केल्यास त्वचा मोकळी होण्यास मदत होते.
  • त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीरावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.
  • एक आड एक दिवस हा प्रयोग केल्यास तुम्हांला अपेक्षित निकाल मिळण्यास मदत होईल.

या स्क्रबरचे फायदे

त्वचेतील शुष्कता कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा एक्सफोलाईट होण्यास मदत होते. यामध्ये मिसळलेले इसेंन्शियल ऑईल त्वचेला होणारी जळजळ, खाज यापासून आराम मिळवून द्यायला मदत करते. तसेच त्वचा मुलायम होते.

Reference

Lauren Cox, Janice Cox, EcoBeauty: Scrubs, Rubs, Masks, Rinses, and Bath Bombs for You and Your Friends, 2009, 55-Page


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>