Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटाच्या आतड्यातील कॅन्सरच्या रुग्णांमध्ये केमोथेरपी किंवा विशिष्ट औषधानंतर Hand-foot syndrome (HFS) हा दुष्परिणाम आढळून येतो. स्किन सेल्समधून औषधाची मात्रा बाहेर पडल्यास त्वचेवर काही रिअॅक्शन झाल्याचे दिसून येते. HFS मुळे त्वचेवर लाल चट्टे दिसणे, सूज येणे, वेदना होणे अशी लक्षणं आढळून येतात. याकरिता काही उपचारांनी त्यावर मात करता येते. पण हीना या नैसर्गिक उपायानेदेखील HFS चा त्रास कमी होण्यास मदत होते. ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून अनेकींना प्रेरणा देणार्या उज्ज्वला राजेंचा कणखर प्रवास ! नक्की जाणून घ्या.
डिपार्टमेंट ऑफ ऑनकोलॉजीच्या डॉक्टरांच्यामते, कॅन्सरच्या उपचारादरम्यान तोंडाद्वारे काही केमोथेरपी ड्रग दिल्या जातात. यामुळे हाता-पायाला त्रास होऊ शकतो. तेथील डॉक्टरांनी सहा रूग्णांना या लक्षणानंतर हीनाच्या पानांची पेस्ट हाता-पायाला लावण्यानंतर हा त्रास कमी झाला. हा उपाय केल्यानंतर त्यांचा त्रास कमी झाला सोबतच त्याचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे औषधांचा डोस कमी न केमोथेरपी ड्रग्जचा दुष्परिणाम कमी करणे यशस्वीरित्या शक्य झाले. 2008 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अॅन्टी इन्फ्लामेंटरी (दाहशामक) क्षमतेमुळे वेदना कमी करण्यास मदत झाली. ‘हीना’ – केसगळती दुर करणारा रामबाण घरगुती उपाय आहे.
- कसा कराल हा उपाय ?
केमोथेरपीनंतर हात-पाय लालसर दिसत असल्यास
हाता-पायांवर सूज आल्यावर
या उपायाकरिता शुद्ध स्वरूपातील हीना पावडर वापरा. केसांसाठी वापरलेली जाणारी मेहेंदी यामध्ये फायदेशीर ठरत नाही.
Prevention is better than Cure हे म्हाणतात तेच खरे ! म्हणूनच फोर्टीस हॉस्पिटल्सचे कन्सलटंट, ऑन्को सर्जन डॉ. अनिल हेरूर यांच्या मते, कॅन्सरच्या रुग्णामधील हॅन्ड-फूट सिंड्रोमवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही खास टीप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. औषधांच्या मात्रा सेल्समधून बाहेर पडू नयेत म्हणून केमोथेरपीनंतर खालील सवयी अवश्य पाळा -
- गरम पाण्याचा वापर किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा. थंड पाणी प्रामुख्याने वापरा.
- हलका व्यायाम करा. केमोथेरपीनंतर सुरवातीच्या काही दिवसात जड वस्तू उचलणे, जॉगिंग, रनिंग यासारखे थकवणारे व्यायामप्रकार टाळा.
- हाता-पायांवर थंड पाणी किंवा आईस पॅकचा वापर करा.
- सॉफ्ट स्लिपर्सचा वापर करा. यामुळे पाय घासले जाणार नाहीत.
- डिटरजंट किंवा स्वच्छतेसाठी वापरली जाणारी लिक्विड्सचा वापर टाळा. यामुळे हात रफ होतात.
- मऊ आणि आरामदायी कपडे घाला. तसेच सॉक्स अवश्य घाला.
- हाता-पायाला सौम्य आणि तुमच्या त्वचाप्रकारानुसार योग्य मॉईश्चरायझर लावा.
Reference
[1] Invest New Drugs. 2008 Apr;26(2):189-92. Epub 2007 Sep 21. Topical henna for capecitabine induced hand-foot syndrome. Yucel I(1), Guzin G.