Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock ( प्रातिनिधिक स्वरूपातील छायाचित्र)
वजन घटवण्यासाठी डाएट सुरू झाले की अनेकांच्या गोड खाण्यावर आपोआपच बंधन येतात. मग अशावेळी गोड खाण्याच्या इच्छेवर मात करण्यासाठी फळं खाणे हा एक सोपा उपाय आहे. पण जेवणाच्या वेळी गोडाचा पदार्थ किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास तुम्ही ‘खजूर- नट्स’ मिठाई हा झटपट तयार होणारा गोडाचा पदार्थ नक्की करून पाहू शकता. खजूर शरीरातील रक्त वाढवण्यासाठी तसेच आयर्नचा पुरवठा करणारे असल्याने तुम्ही प्रसन्न राहता. यासोबतीने यामध्ये सुकामेवा आणि खोबरे असल्याने यामधून शरीराला मुबलक प्रमाणात पोषणद्रव्य मिळते. सकाळच्या नाश्त्याला केळं-खजूराचा मिल्कशेकदेखील उत्तम पर्याय आहे.
साहित्य -:
- 2 कप मऊ खजूर ( लाल खजूर असल्यास 2 तास भिजवा)
- 1 कप बदामाचे काप
- 1 कप काजूचे काप
- ½ टीस्पून वेलचीपूड
- 2-3 टेबलस्पून डेसिनेटेड कोकोनट
कृती :
- पाण्यात खजूर भिजवला असल्यास पाणी निथळून बाहेर काढा.
- सारे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून हलकेच फिरवून घ्या.
- तयार पेस्ट बाहेर काढून त्याचा रोल बनवा.
- तयार उंड्याच्या पातळ स्लाईस करा.
- प्रत्येक स्लाईस डेसिनेटेड कोकोनटमध्ये घोळवून प्लेटमध्ये ठेवा.
- आता ही प्लेट किमान 15 मिनिटे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा.
- थंडगार आणि सेट झालेले स्लाईस खायला सर्व्ह करा.
अशाचप्रकारे तुम्ही खजूर रोल्सदेखील बनवू शकता.