Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य : Shutterstock
तुम्हांला झटपट वजन कमी करायचयं ? मग आता योगा, डाएट आणि व्यायामाच्या हेक्टीक शेड्युलमधून वेळ काढून ‘अॅपल-सिनॅमन’ ड्रिंक प्या. हे ड्रिंक लो-कॅलरी आणि डिटॉक्स ड्रिंक आहे. यामुळे शरीराला पुरेशी उर्जा मिळेल तसेच काही किलो वजन कमी करण्यासाठीदेखील मदत होईल. सौंदर्य आणि आरोग्य सुधारते ‘सफरचंद’ !
- का आहे हे ड्रिंक फायदेशीर ?
सफरचंदामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र फायबर अधिकप्रमाणात आढळते. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. सफरचंद आणि दालचिनी दोन्ही अॅन्टीऑक्सिडंटयुक्त असतात. त्यामुळे मेटॅबॉलिझमला चालना मिळते. तसेच दालचिनीमुळे पचन सुधारते. वारंवार आणि वेळीअवेळी लागणार्या भूकेवरही नियंत्रण मिळवणे सुकर होते. परिणामी वेट लॉसची प्रक्रिया सुकर होते. सफरचंद आणि दालचिनीमध्ये ए, बी2, बी6, बी12, ई आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते तसेच प्रसन्न आणि तजेलदार राहण्यास मदत होते. यासोबतच परिणामकारक वजन घटवतील ही ’15′ घरगुती ड्रिंक्स
कसे बनवाल हे ड्रिंक ?
- ग्लासमध्ये सफरचंदाचे काही तुकडे करून टाका.
- यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाका.
- यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे टाका. व उरलेला ग्लास पाण्याने भरा.
- 15 मिनिटे हे पेय फ्रीजमध्ये ठेवा आणि थंडगारच प्या.
तयार केलेले ‘अॅपल – सिनॅमन ड्रिंक’ हे फ्रीजमध्ये तीन दिवस ठेऊ शकता. मात्र त्यानंतर नवीन बनवून फ्रेश प्या. पहा ‘अॅपल – सिनॅमम मफिन्स’ची खास रेसिपी
कधी प्याल हे ड्रिंक ?
सकाळी ब्रेकफास्ट घेण्याआधी हे पेय पिणे फायदेशीर आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच शरीराचे डिटॉक्सीफाय होण्याची प्रकियादेखील सुधारते.
मग तुमचे वेट लॉस मिशन यशस्वी करण्यासाठी उद्या सकाळपासूनच ‘अॅपल-सिनॅमन’ ड्रिंक प्यायला सुरवात करा.
खबरदारीचा उपाय :
हा एक घरगुती उपाय आहे. याचा परिणाम दिसण्यासाठी काही दिवसांचा अवधी नक्की लागेल. तसेच वैद्यकीय सल्ल्याशिवाय हा उपाय करू नका.
Reference:
[1] Ranasinghe, P., Pigera, S., Premakumara, G. S., Galappaththy, P., Constantine, G. R., & Katulanda, P. (2013). Medicinal properties of “true” cinnamon (Cinnamomum zeylanicum): a systematic review. BMC Complementary and Alternative Medicine, 13, 275. doi:10.1186/1472-6882-13-275