Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘झिका व्हायरस’– WHO कडून जागतिक हेल्थ इमरजन्सी घोषित !

$
0
0

आशिया आणि आफ्रिका पाठोपाठ ‘झिका’ व्हायरसचे थैमान अमेरिकेतही पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच WHO  ( वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन ) ने एका तातडीचे बैठक बोलावून ‘झिका’ व्हायरसचा धोका ही ‘पब्लिक हेल्थ इमरजन्सी’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. गर्भवती स्त्रियांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यास सदोष मूल जन्माला येण्याचा धोका आहे. त्यामुळे काही देशात पुढील काही काळासाठी बाळाचा विचार पुढे ढकलण्याचा सल्लादेखील दिला जात आहे.

  • ‘झिका’ व्हायरस कसा पसरतोय ?

एडिस जातीच्या डासाने पसरणारा हा एक व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. या जातीच्या डासाच्या दंशामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियादेखील पसरतो.

#1 गर्भवती स्त्रीकडून बाळाला धोका – :

गर्भारपणाच्या काळात आईकडून नवजात बाळाला ‘झिका’ व्हायरसचा संसर्ग होतो. यामध्ये व्हायरस बाळाच्या अविकसित  मेंदूवर थेट हल्ला करतो. अशा प्रकारामुळे जन्माला येणार्‍या बाळाचे डोके शरीराच्या तुलनेत छोटे असते. या आजाराला ‘मायक्रोसेफली’ म्हणतात. ब्राझीलमध्ये ऑक्टोबर 2015 पासून सुमारे या आजाराचे 4000 बालक जन्माला आलेले आहेत.

 सनशाईन हॉस्पिटल -नेरूळचे फिजिशियन डॉ. संदीप सोनावणे यांच्या मते, गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात आईला या व्हायरसचा संसर्ग झाल्यास बाळाला ‘मायक्रोसेफली’चा धोका असतो. या काळात गर्भाचे अवयव विकसित होत असल्याने हा धोका अधिक बळावतो. तर गर्भारपणाच्या पुढील टप्प्यांमध्ये हा संसर्ग झाल्यास तुलनेत धोका कमी होतो. ( नक्की वाचा : गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?)

#2 रक्तातून होणारा संसर्ग -:  

वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशनच्या अमेरिकेतील रिजनल ऑफिस ( PAHO) च्या अहवालानुसार, ब्लड ट्रान्सफ्युजन टाळण्याच्या प्राथमिक सुरक्षा न पाळल्यास तो पसरू शकतो. मात्र त्याला रोखणे शक्य आहे.

  • लक्षणं 

झिका व्हायरसमुळे फ्लू ची लक्षण आढळून येतात. यामध्ये सौम्य ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, अंगावर रॅशेज येणे अशी प्राथमिक लक्षणं दिसतात. डासाच्या दंशानंतर किमान 2-7 दिवसांमध्ये दिसून येतात.

  • धोका कोणाला ? 

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या हृद्यविकार, मधूमेह  आणि यकृताचे विकार असलेल्या रुग्णांना इंफेक्शनचा धोका अधिक असतो. सोबतच वयोवृद्ध लोक, गर्भवती स्त्रिया व लहान मुलांना ‘झिका’ व्हायरसचा संसर्ग अधिक होऊ शकतो. यामुळे नवजात बालमृत्यूचे  प्रमाण अधिक नसले तरीही यामुळे जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पॅरॅलिसिस, लिव्हर फेल्युयरचा धोका असल्याचे मत डॉ. सोनावणे यांनी व्यक्त केले आहे.

  • खबरदारीचा उपाय -: 

भारतात अजूनही ‘झिका’ व्हायरसचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र परदेशातून भारतात येणार्‍या पर्यटकांची, संशयित रुग्णांची पुरेशी चाचणी देशभरात केली जात आहे. तसेच  या व्हायरसचा धोका डासांमुळे पसरत असल्याने तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. डबकी  किंवा घरात फार दिवस पाणी भरलेले राहणार नाही याची काळजी घ्या. तसेच डासांना पळवून लावा या ’10′ नैसर्गिक उपायांनी !


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles