मेष -:
मध्यम व त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांना काही जुन्या व्याधी पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अल्टरनेटीव्ह औषधांचा वापर करा. इतरांचे आरोग्य ठीक-ठाक राहील. मात्र ते गृहित धरून आरोग्याची हेळसांड करू नका. फीटनेस वाढवण्यासाठी जीवनात चांगल्या सवयींचा वापर वाढवा.
वृषभ -:
सर्दी-पडशाचा त्रास या आठवड्यात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ औषधोपचार करा. मध्यमवयीन आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संध्याकाळी नियमित चाला.
मिथून -:
या आठवड्यात पचनमार्गाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे.त्यामुळे हेल्दी डाएट आणि जेवण्याच्या वेळा पाळा. अस्थमा, अर्थ्राईटीसच्या रुग्णांनी औषधाच्या वेळा पाळा. यावर मात करण्यासाठी काही अल्टरनेटीव्ह उपचारांची मदत घ्या.
कर्क -:
मध्यमवयीन आणित्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांना काही जुने विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने योग्य औषधोपचार करा. इतरांना हा आठवडा आरोग्यदायी ठरणार आहे. मात्र आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा.
सिंह -:
या आठवड्यात आरोग्याशी निगडीत काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र योग्य आणि वेळेवर केलेल्या औषधोपचारांनी त्यावर मात करता येणे शक्य आहे. व्याधींना दूर ठेवण्यासाठी जिम किंवा योगाची मदत घेऊन फीटनेस वाढवण्याचा प्रयत्न करा.
कन्या -:
या आठवड्यात तुम्हांला व्हायरल फिव्हरचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुले किमान दोन दिवस सक्तीचा आराम करणे भाग पडेल. अपघाताची दाट शक्यता असल्याने सावधानता पाळा. हा आठवडा आरोग्यासाठी प्रतिकूल असल्याने डाएट आणि लाईफ़स्टाईलमध्ये सकारात्मक बदल करा.
तूळ -:
तणावग्रस्त परिस्थितीमुळे मध्यमवयीन लोकांना रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन शांत करण्यासाठी आराम करा. मानसिक अस्वस्थेमुळे पचनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपचार करा.
वृश्चिक -:
हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी राहील. काही जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने त्यावर काळजीपूर्वक उपचार करणे आवश्यक आहे. वाहनं चालवताना अपघाताची शक्यता असल्याने सावधपणे चालवा.
धनू -:
अनपेक्षितपणे अपघाताची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या. पचनमार्गाचे विकार त्रासदायक ठरण्याआधीच उपचार करा. त्याची गंभीरता वाढण्याआधीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या.
मकर -:
तुमच्या राशीचे ग्रहमान आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. त्यामुळे लहानसहान समस्यांकडेदेखील दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कुंभ -:
या आठवड्यात पचनाचे विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार वेळीच सुरू करा. अस्थमा, अर्थ्राइटीस याचा त्रास असणार्यांनी अल्टरनेटीव्ह उपचारांची मदत घ्यावी.
मीन -:
या आठवड्यात जुने विकार पुन्हा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. पचनविकारांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ औषधोपचार करा. अनपेक्षितपणे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सावधानता पाळा. शारिरीक हालचाली आणि ड्राईव्हिंग सावधपणे करा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Image may be NSFW.
Clik here to view.