Read This in English
Translated By - Dipali Nevarekar
सफरचंदाच्या सेवनामुळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते पण त्यासोबतच वजन घटवण्यासही ते फायदेशीर आहे. सफरचंद फॅट्स आणि कॅलरीजमध्येदेखील कमी आहे. पण सफरचंदापासून तयार होणारे तुमचे आवडते ‘अॅपल पाय’ किंवा अॅपल शेक यामध्ये मात्र कॅलरीजचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्या कॅलरीकाऊंटवर लक्ष देणे गरजेचे आहे.
- एक लहान सफरचंद = 87.9 cal
- ग्लासभर सफरचंदाचा रस = 196.7 cal
- 1 टीस्पून अॅपल जॅम = 11.4 cal
- 1 कप अॅपल शेक = 104.9 cal
- ग्लासभर अॅपल स्मुदी = 144.7 cal
- 1 टीस्पून अॅपल जेली = 8 cal
- 1 अॅपल पाय = 410.8 cal
हा कॅलरी काऊंट हेल्दीफायमी च्या सहाय्याने देण्यात आला आहे. (HealthifyMe Calorie Counter, the world’s first Indian nutrition tracker.)
आरोग्यासाठी आवश्यक पोषणद्रव्यांचा सफरचंदातून शरीराला पुरवठा होतो. त्यातून व्हिटामिन ए आणि सी चा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. तसेच शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यांसाठी सफरचंद उपयोगी ठरते.डायरिया आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार्यांसाठी सफरचंदातील फायबर्स फायदेशीर ठरतात. तसेच यामध्ये अॅन्टीऑक्सिडंटचे प्रमाण मुबलक असल्याने त्वचा तजेलदार राहते तसेच सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते.
दिवसभरात कधीही भूक लागली तरीही सफरचंद खाणे हा त्यावरील आरोग्यदायी उपाय आहे. सफरचंद सालीसहीत खाणे अधिक फायदेशीर ठरते. यासोबतच अन्य या ’7′ फळांच्या सालीदेखील आरोग्यदायी आहेत. सॅलेडमध्ये अॅपलचा समावेश करणे तसेच रस पिणे फायदेशीर आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी अॅपल खाणे टाळा. यामुळे झोप बिघडू शकते किंवा पित्ताचा त्रास उद्भवू शकतो.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock