Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

#मकरसंक्रांत विशेष -: भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी

$
0
0

मकरसंक्रांत –  15 जानेवारी 2015  

………………………………………………………………………………….

हेमंत ऋतूचे दिवस हे मस्त थंडीचे दिवस, आकाशात संध्याकाळी उडणारे रंगीबेरंगी पतंग, नव्या वर्षाच्या धामधुमीपाठोपाठ येणारा मकरसंक्रात हा येणारा पहिला सण ! या दिवसात भाजीपाला, धनधान्य  तसेच फळाचे मुबलक उत्पन्न होते. निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते तसेच शरीरही हा काळात अधिकाधिक अन्न ग्रहण करण्यासाठी तयार असते. नैसर्गिकरित्या या भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी  साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पाच  भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी केली जाते. लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयाचे वैद्य डॉ. पवन लड्डा यांनी ‘भोगीच्या भाजीचे’ आरोग्यदायी महत्त्व सांगितले आहे. ते जाणून घ्या आणि यंदा हा बेत नक्की करून पहा.  

  • भोगीची भाजी - 

भोगीची भाजी ही वांग, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाणे घालून केली जाते.  वांग हे वातूड असल्याने त्याचा वापर टाळावा असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. पण आयुर्वेदानुसार हिवाळ्याच्या दिवसात  वांग्याचे भरीत खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यास तसेच कफ कमी करण्यास मदत होते. तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात.  यासोबत  दुध, तुप, दही , लोणी, ताक यासारख्या पदार्थांचे मोठया प्रमाणात सेवन करावे. हिवाळयामध्ये शरीराला  उब मिळावी व थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून या पदार्थांचाही आहारात समावेश करावा.  ( नक्की वाचा : थंडीत या ’5′ पदार्थांनी वाढवा शरीरातील उष्णता )

 

  • कशी कराल भाजी -

पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. यामध्ये शेंगदाणे, हरभरे आणि घेवडा घालून वाफा काढावी. नंतर वांगं आणि गाजर घालावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे. 
 भाज्या शिजत आल्या की, चिंचेचा कोळ आणि काळा मसाला घालावा.  भाज्या शिजल्यानंतर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे.  आवश्यकतेनुसार चव पाहून मीठ घाला. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर  भाकरीबरोबर गरमागरम भाजीचा आस्वाद घ्यावा. 

  • भोगीच्या भाजी सोबत बाजरीची भाकरी का ?  
बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळयात खाणे अधिक हितकारी आहे.  बाजरीपासुन दिवे, उंडे, खिचडी, चकोल्या बनविल्या जातात. ज्या बलवर्धक असतात. बाजरी ही बलकारक, उष्ण , अग्निदीपक, कफनाशक असते. त्यामुळे  भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवावी. त्यापीठात देखील तीळ मिसळावेत.  भाकरीच्या सेवनातून शरीराला मिळणार्‍या कॅलरीज नक्की पहा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock   ( सदर चित्र प्रातिनिधिक स्वरूपात  आहे)

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>