Read this in English
Translated By - Dipali Nevarekar
बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) हा वजनाच्या नावाखाली खपवणारी एक संकल्पना ! अनेकदा याबाबतच्या अपुरी माहितीमुळे त्याबद्दल गैरसमजच अधिक आहेत. म्हणूनच त्याबाबत गोल्ड जिमचे फीटनेस एक्सपर्ट अल्थ शहा यांच्याकडून नेमके जाणून घ्या.
- BMI म्हणजे काय ?
बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. 18 वर्षांवरील मुला-मुलींच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बीएमआय काढले जाते. यामधून उंचीच्या तुलनेत शरीराचे अपेक्षित वजन कमी किंवा जास्त आहे का ? हे ओळखता येऊ शकते.
शरीराचे बीएमआय ठाऊक असणे फार आवश्यक आहे. हाय बीएमआय म्हणजे शरीरात बॉडी फॅटचे प्रमाण अधिक असल्याचे व त्यानुसार वजनही अधिक असल्याचा संकेत मिळतो. अपेक्षित बीएमआय नसणे म्हणजे मधूमेह, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण, हृद्यविकाराचा धोका तसेच संधीवाताचे दुखणे ओढावू शकते.
BMI कसा कॅलक्युलेट कराल ?
# 1: वजन करा.
# 2: त्यानंतर तुमची उंची मीटरमध्ये मोजून लिहा. जर सेंटीमीटरमध्ये उंची मोजली असेल तर त्याला 100ने भाग द्या.
# 3: बीएमाय मोजण्याचे सूत्र – वजन / (उंची) 2
उदारणार्थ -:
वजन =60 किलो
उंची = 166सेंटीमीटर ( 1.66 मीटर)
कृती : 60 ÷ (1.66)2 = 21.77
बीएमआय = 21.77
निष्कर्ष – :
- 18.5 पेक्षा कमी बीएमआय : अंडरवेट ( अपेक्षेपेक्षा कमी वजन)
- 18.5 – 25 च्या दरम्यानचा बीएमआय : योग्य वजन
- 25 – 30 च्या दरम्यानचा बीएमआय : अतिवजन
- 30 – 40 च्या दरम्यानचा बीएमआय : लठ्ठ
- 40 पेक्षा जास्त बीएमआय : अतिलठ्ठ
BMI किती अचूक असतो ?
बीएमआय हा स्त्री आणि पुरूषांसाठी वेगवेगळा असतो. तसेच तो 100 % अचूक असेलच असे नाही. बीएमआय काढताना केवळ उंची आणि वजनाचा विचार केला जातो. मात्र यामध्ये बॉडी फ़ॅट किंवा मसल्सचा विचार केला जात नाही. समान बीएमआय असणार्या पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये बॉडी फॅट अधिक असतात. तसेच तरूण मुलांच्या तुलनेत वयोवृद्ध व्यक्तीच्या सारख्या बीएमआयमध्येदेखील वयोवृद्धांमध्ये बॉडीफॅट अधिक असते. अॅथलिटसच्या शरीरात सामान्य व्यक्तीच्या तुलनेत अधिक बॉडीफॅट आढळते.
अचूक बीएमआय काढण्याचा दुसरा काही पर्याय आहे का ?
अजून अचूक बीएमआय मोजण्यासाठी स्किनफोल्ड थिकनेस मेजरमेंट, अंडरवॉटर वेईंग किंवा बायोइलेक्ट्रिकल इम्पेडेंस (bioelectrical impedance) याची मदत घेता येऊ शकते. मात्र या खर्चिक, तज्ञ व्यक्तीकडून तसेच किचकट पद्धती आहेत. यापेक्षा जीममध्ये बॉडी कम्पोजिशन अॅनॅलिसिस मशीनच्या मदतीनेदेखील तुम्ही अपेक्षित वजन पाहू शकता.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock