Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! ( 27जुलै – 2 ऑगस्ट)

$
0
0

मेष –: आरोग्याच्या  दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अगदी  ठणठणीत आहे.  परंतू  काहींना पचनाचा  त्रास संभवण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपचारांनी हा त्रास आटोक्यात आणण्यास तुम्हांला यश  येईल.  मधुमेहींनी  औषधांच्या वेळा पाळाव्यात.

वृषभ -:  काही जुने आजार पुन्हा डोक वर काढण्याची शक्यता आहे.  पचनक्रियेशी संबंधित काही आजार असल्यास  त्यावर वेळीच उपाय करा. तरुणांचे या आठवड्यातील आरोग्य उत्तम आहे.

मिथुन -:  सर्दी-खोकल्यासारखे लहान-सहान आजार  या आठवड्यात तुम्हांला त्रास देण्याची शक्यता आहे.   मंगळ अधिक प्रभावी असल्याने उच्चरक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.  वेळच्यावेळी चाचण्या  कराव्यात.  इतरांनीदेखील आरोग्याकडे दुर्लक्ष न करता निरोगी  राहण्यासाठी  नियमित व्यायाम करावा.

कर्क -: या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम  राहिल.  दीर्घकाळ  निरोगी   राहण्यास  चांगली जीवंशैली, सकस आहार व  नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काहींना खोकल्याचा  त्रास होण्याची  शक्यता आहे. परतू  योग्य औषधोपचार तुम्ही त्यावर मात करू  शकाल.

सिंह -:  पचनाचा  त्रास वगळता  हा आठ्वडा तुमच्या  आरोग्यासाठी उत्तम आहे.  मध्यमवयीन व काही  वृद्ध लोकांमध्ये वयापरत्वे संधीवात,रक्तदाब याचा  त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  संबंधित चाचण्या आणि  औषधांकडे  दुर्लक्ष  करू नका.

कन्या -:  व्हायरल इंन्फेकशनमुळे  तुम्हांला  या  आठवड्यांत  काही  त्रास  होण्याचा  धोका आहे.  त्यामुळे आरोग्याचे संकेत  वेळीच जाणा.अन्यथा तुमचे आरोग्य ठीक राहिल. ध्यान व योगसाधनेने तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत  होईल.

तूळ -: या  आठवड्यात  पचनाचे विकार तुम्हांला त्रासदायक  ठरू शकतात. त्यातील गंभीरता  टाळण्यासाठी वेळीच निदान  आणि उपचार करा. मध्यमवयीन लोकांमध्ये श्वसनाचे विकार  जडण्याची शक्यता आहे. अस्थमाच्या  रुग्णांनी विशेष  काळजी  घ्यावी.

वृश्चिक -:  या आठवड्यात आरोग्य विषयक गंभीर  स्वरुपाची समस्या उद्भवणार  नसली तरी ग्रहमानानुसार व्हायरल इंन्फेक्शन्स टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्या. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात पुरेशा ‘डायटरी सप्लिमेंट’चा  वापर  करा. चांगल्या स्वास्थ्यासाठी नियमित  योगासनांचा सराव  करावा.

धनु -: पचनक्रियेत बिघाड होत असेल तर सावध रहा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या व योग्य औषधोपचार करा. त्यामुळे तुम्ही काही  दिवस घरीच आराम कराल. यामुळे  तुम्हांला  लवकर बरे  होण्यास  मदत  होईल  तसेच तुम्ही नव्या उत्साहाने पुन्हा  कामाला  लागाल.

मकर -: रक्तदाबाचा त्रास असणार्‍या लोकांनी वेळोवेळी  चाचणी  करणे आवश्यक आहे. सांधेदुखीचा  त्रास पुन्हा होण्याची संभावना आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या डोक्याला, गुडघ्याला दुखापत होण्याची शक्यता आहे.

कुंभ -: या आठवड्यात तुम्हांला आरोग्यविषयक चिंतेचे  काही कारण  नाही. मात्र मधुमेह, रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन  आजारांच्या रुग्णांनी वेळोवेळी योग्य  चाचण्या व उपचार करावेत. मात्र  काहींना शरीराच्या  खालील भागात दुखापत  होण्याची शक्यता  आहे.

मीन -:  तुम्हांला आरोग्यविषयक गोष्टींची काळजी करण्याचे काही विशेष कारण नाही. मात्र रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी अशा समस्यांशी सामना करणार्‍या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.ऋतूमानात होणारे  बदल तुमच्या शरीरावर परिणाम करू शकतात. चटकदार पदार्थ खाणे टाळा. आरोग्यदायी आहार आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.

GaneshaSpeaks logo

 

 

 

 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>