Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान-मोठ्या जखमांवर कसे कराल घरच्याघरी औषध ?

$
0
0

घाईच्या वेळी काम करताना अनेकदा बोटांना चिर पडते किंवा छोटेमोठे अपघात होतात. प्रत्येकवेळी हॉस्पिटलमध्ये जाऊनच तातडीने उपाय घ्यायची गरज नसते. काहीवेळेस घाबरून न जाता घरीच काही उपाय केल्यास धोका टाळता येऊ शकतो. मग अशाच काही लहान – मोठ्या जखमांना भरून काढण्यासाठी हे प्रथमोपचार वेळीच करा.

  • छोटीशी जखम किंवा चिर -

जखम फार मोठी नसल्यास आणि खूप रक्त जात नसल्यास ती प्रथम स्वच्छ धुवावी. त्यावर कोरडा आणि स्वच्छ रुमाल किंवा कापसाचा बोळा धरावा. जखम लहान असल्यास ती बॅन्डेज किंवा ऑईनमेंट्सशिवायही भरून येते.

  • डीप कट आणि खूपच रक्त जात असल्यास

काही वेळेस जखमांचा घाव हा खोल असल्यास खूपवेळ रक्त वाहू शकते. अशा वेळेस खालील उपाय करावेत.

  • जखम वाहत्या पाण्याखाली धरून स्वच्छ करावी. रक्त वाहत असल्यास त्यावर दाब द्यावा.
  • रक्त वाहणं थांबणे हे फार गरजेचे आहे. त्यासाठी जखमेवर स्वच्छ रुमाल किंवा कापसाचा बोळा दाबून ठेवा.
  • किमान 5 मिनिटं थेट जखमेवर दाब द्यावा.
  • रक्ताने कापसाचा बोळा भिजल्यास तो काढून टाकू नका. त्यावरच दुसरा बोळा / कपडा ठेवा.
  • रक्त थांबले की नाही हे पाहण्यासाठी बोळा काढू नका.
  • हातावर झालेल्या जखमेला हृद्याच्या वरच्या दिशेने धरून ठेवा. यामुळे रक्तप्रवाह आटोक्यात राहण्यास मदत होईल.
  • रक्त वाहायचे थांबल्यास कापसाचा / कापडाचा बोळा काढून त्यावर नवा बोळा ठेवा.

बॅन्डेज कसे कराल ?

  1. जखम वरच्या बाजूला असेल आणि त्यावर सतत घाण / माती लागणार असेल तर ती बंद करणं आवश्यक आहे. यामुळे इंन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  2. हातापायांची बोटं किंवा सतत वापरातल्या भागाव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या जखमा उघड्या राहिल्यास त्या अधिक लवकर सुकू शकतात.
  3. कोपरावरील किंवा गुडघ्यावरील जखम खोल असल्यास त्यावर बॅन्डेज लावा. यामुळे कपडे घालताना, काढताना त्रास होणार नाही.
  4. जखम मोठी असल्यास ती बॅन्डेजने बंद करणे सोयीस्कर आहे.

डॉक्टरांकडे कधी जावे ?

  1. जखम धारदार किंवा संसर्गजन्य शस्त्राने झाला असल्यास टेटनसचे इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
  2. 5- 10 मिनिते दाब देऊनही रक्त वाहणे थांबले नाही तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित दुवे -

जखमांचे व्रण कमी करणारे ’8′ घरगुती उपाय !

भाजण्यावर करा हे ‘७’ घरगुती उपाय


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - first-for-cuts-and-bleeding

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>