हिवाळ्यात उत्तम प्रकारची लिपस्टिक वापरूनदेखील ओठांचा शुष्कपणा लपवता येत नाही. या दिवसात त्वचेला विशेष मॉईश्चरायझरची गरज असते. त्यामुळे ब्युटी प्रोडक्ससोबत मुबलक पाणी आणि व्हिटामिन बी युक्त आहाराचा समावेश करा. अननस, बाजरी,मनुका,बदाम यांचा आहारात मुबलक समावेश केल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
ओठांचे आरोग्य जपण्यासाठी शक्य होईल तितक्या नैसर्गिक उपायांचा वापर करा. तसेच केमिकलयुक्त प्रोडक्सपासून दूर रहा. असा सल्ला सेलिब्रिटी नॅचरोपॅथ डॉ. निर्मला शेट्टी देतात.
मग ओठांचे सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी तुम्ही लिप बाम घरीदेखील बनवू शकता.
साहित्य -:
कसे बनवाल :
- कच्च्या भोपळ्याचे काप वाटून त्याची पेस्ट बनवा.
- यामध्ये शहाळ्याची मऊ मलाई मिसळा.
- हे मिश्रण एकत्र करून 10-15 मिनिटे फ्रिझरमध्ये ठेवा.
- हा तयार लीप बाम दिवसातून 2-3 वेळा ओठांना लावा.
का आहे हा लीप बाम फायदेशीर -:
भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश तसेच व्हिटामिन ए चा साठा मुबलक असतो. यामुळे ओठावरील त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तर शहाळ्यातील मलई त्वचेमध्ये मॉईश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे ओठ दीर्घकाळ मुलायम राहण्यास मदत होते. मधामुळे ओठांना मुलामा मिळतो. तसेच इंन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या ओठांचे सौंदर्य जपण्यास मदत होते.
संबंधित दुवे -
घरगुती उपायांनी जपा ओठांचे सौंदर्य !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - DIY pumpkin lip balm for soft, kissable lips
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.