कामाच्या व्यस्त वेळांमुळे अनेकजण पॅकेज्ड फूडचा पर्याय निवडतात. वेळेच्या अभावी अशा स्वरूपातील पदार्थ विकत घेऊन ते शिजवणे अधिक सोपे ठरते. पण वेळेची बचत करणारा हा पर्याय आरोग्यदायी आहे का?
अन्नाची पोषकता राखण्यासाठी तसेच त्यामध्ये बॅकटेरीयाची वाढ रोखण्यासाठी पॅकेजिंग़ फार महत्त्वाची भूमिका पार पाडते. योग्य प्रकारे पॅक केलेले अन्न सुरक्षित राहते सोबतच दीर्घकाळ टिकण्यास मदतही होते. यामुळे अन्न वाया जाण्याची शक्यताही कमी होते. मात्र आहारतज्ञ आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पॅक केलेले अन्न हे त्रासदायक ठरू शकते. पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे मटेरियल अन्न दूषित करू शकते. त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. म्हणूनच जाणून घ्या अन्न दुषित होण्याची ही ’5′ कारणं
1. ग्लास /काच :
अन्न सुरक्षा विभाग (FDA) च्या मते, ग्लास / काच हे पॅकेजिंगचे सुरक्षित माध्यम आहे. पण द्रव स्वरूपातील काही पदार्थांची साठवणूक करणार्या बाटल्यांमध्ये लेड ( शिसं) असण्याची शक्यता अधिक आहे. लेड या विषारी घटकाचा शरीरात अतिपरमाणात प्रवेश झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ लेड शरीरात गेल्यास उलट्या होणे, लिव्हर, किडनी निकामी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. किडनी विकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका!
काचेच्या बाटलीवर किंवा जारवर असणार्या मेटल बूचामधून देखील थॅलेट (phthalate ) या केमिकलचा प्रसार होतो. हे शरीरात गेल्यास हार्मोन्सच्या कार्यात बिघाड होऊ शकतो.
2. एनर्जी ड्रिंक्स / बिअर कॅन :
पातळ स्वरूपातील अॅल्युमिनियमपासून कॅन्स बनवले जातात. तर ड्रिंक्स अधिककाळ टिकण्यासाठी ऑर्थो-फिनेलफेनल (ortho-phenylphenol) या पेस्टिसाईडचा वापर केला जातो. यामुळे पेयामधील बॅक्टेरिया आणि फंगसची वाढ रोखण्यास मदत होते.
3. प्लॅस्टिक पॅकेजिंग :
अन्नपदार्थ प्लॅस्टिकमध्ये पॅक करावेत का? हा फूड इंडस्ट्रीतील एक वादाचा मुद्दा आहे. त्यातील घातक पदार्थांमुळे FDA ने यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. प्लॅस्टिकमध्ये आढळणारे बिस्फेलन ए (chemical bisphenol A) हे केमिकल आरोग्यावर घातक परिणाम करू शकतो. यामुळे लहान मुलांच्या मेदूंवर तसेच पुनरोत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
4. ज्युस किंवा दूधासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक डब्बे :
पॉल्योलेफ़िन्स (polyolefins)या पॅकेजिंग घटकांचा यामध्ये प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र बेन्जोफेनन (benzophenone) या घातक घटकाचा स्त्री आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असति. यामुळे स्त्रीप्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
5. पेपर :
कागदाचा किंवा कार्डबोर्डचा वस्तू साठवण्यासाठी वापर करणे हे देखील वादाचे आहे. काही अभ्यासाच्या अहवालानुसार वर्तमानपत्राच्या छ्पाईत वापरली जाणारी शाई पदार्थांमध्ये खेचली जाऊ शकते. परिणामी शरीरात हार्मोनल बिघाड होण्याचीदेखील शक्यता असते. रिसायकल केलेले पेपर बॉक्सदेखील घातक ठरू शकतात. या प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्या घटकामुळे पचनाचे विकार वाढू शकतात.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - 5 food packaging materials that can be harmful for your health
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.