Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

झटपट रिफ्रेश होण्यासाठी करा ‘पृथ्वीमुद्रा’

$
0
0

योगा म्हणजे केवळ स्ट्रेचिंग किंवा डीप ब्रिथिंग नव्हे तर मुद्रा शास्त्रदेखील योगसाधनेतील एक प्रकार आहे.यामुळे शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. पृथ्वी मुद्रा दीर्घकाळ चालणार्‍या थकव्याला दूर करण्यास मदत करते. शरीरातील उर्जा कमी झाल्याने निस्तेज किंवा थकल्यासारखे वाटत असल्यास ही मुद्रा करावी. ताण तणाव वाढल्याने अकाली केस पांढरे होणे, रक्तदाब वाढणे अशा समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. पृथ्वी मुद्रेमुळे एकाग्रता वाढण्यास तसेच मन स्थिर होण्यास मदत होते.

कशी कराल पृथ्वी मुद्रा - 

  • शक्य असेल तर पद्मासनात बसा. ( कोणत्याही स्थिर स्थितीत बसलात तरी चालेल) हाताचे तळवे गुडघ्यावर ठेवून श्वासावर लक्ष नियंत्रित करा.
  • अनामिकेचे टोक ( करंगळीच्या बाजूचे बोट ) अंगठ्याला जुळवा. मात्र त्यावर अति दाब देऊ नका. ही मुद्रा दोन्ही हातांनी करा.
  • हळूहळू श्वास घेत या स्थितित 10-15 मिनिटे बसा.
  • ही मुद्रा तुम्ही दिवसात कधीही करू शकता. दिवसातून 30-40 मिनिटे ही मुद्रा केल्यास फायदेशीर ठरते.
  • नियमित ही मुद्रा केल्यास अधिक फायदा मिळतो.

खबरदारीचा उपाय :

  • कफाचा त्रास असल्यास पृथ्वी मुद्रा अधिक वेळ  करणे टाळा.
  • कफ दोष असल्यास योग्य व्यक्ती, योगगुरूकडून आवश्यक मार्गदर्शन करा.

संबंधित दुवे - 

‘आपन मुद्रा’ – शरीर डीटॉक्स करण्याचा नैसर्गिक पर्याय !

वायुमुद्रा- शरीरातील वात कमी करण्याचा नैसर्गिक उपाय !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  This mudra can make you active and alert!

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>