दह्याशिवाय कोणताच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारते तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. अमेरिकन जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या मते, दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
दह्यातील कॅलशियम घटक पेशींमध्ये कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती करण्यास प्रतिबंध करतात. घातक कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती वाढली तर लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता बळावते.
आरोग्यदायी दही -
पचनासोबतच दह्यामुळे आहारातील पोषणद्रव्यांचे शोषण होणे सुलभ होते. तसेच प्रोटीन घटकचा शरीराला पुरवठा झाल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. तसेच पोटाजवळ फॅट्स साचून राहण्याची समस्या आटोक्यात राहते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
लो फ़ॅंट दही हे वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील फॅट्स फारसे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरत नाहीत. पण तरीही प्रमाणात दही खाणे हेच योग्य आहे.
कसे घ्याल आहारात दही ?
जेवणात किंवा जेवल्यानंतर तुम्ही वाटीभर दही खाणे हितकारी आहे. किंवा जेवण बनवतानाही त्याचा वापर केला जाऊ शकतो.
फळांचे किंवा भाज्यांचे सॅलड करून त्यात दही मिसळता येऊ शकते.
यामधून कॅलरी वाढण्याची भीती तुम्हांला वाटतेय ? तर मग घाबरायची काहीच गरज नाही. हेल्दीफायमी कॅलरी काऊंटच्या मते, वाटीभर दह्यातून केवळ 57 कॅलरीज मिळतात. त्यामुळे घरीच विरजण लावा. आणि या हेल्दी पर्यायाचा आनंद लूटा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Eat a bowl of curd every day
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.